मुख्यमंत्री लाडकी बहीन योजना फक्त कागदोपत्रीच
मुखेड (प्रतिनिधि):
मारुती पवार
तालुक्यात गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून राबवल्या जात आहे, पण त्याची प्रत्यक्ष रित्या किती महिलांना फायदा होतो याचा कुठेच नोंद नाही. मुखेड येथे गेली २०/३० वर्षात बजरंगनगर (वडारवाडी) वस्ती आहे, तेथे शासनाची योजनाच काय तर तेथील वस्ती कुठल्या क्षेत्रात मोडते ह्याचेपन पंचायत समिती, मुखेड तेथे नोंद नाही. पंतप्रधान आवास योजना, मोदी आवास योजना, रमाई आवास योजना, महात्मा फुले आवास योजना यासारख्या योजना रखडत पडलेल्या असल्या तरी त्याचा फायद तेथील भटक्या समाजाला आद्याप मिळालेल्या नाहीत.
तेथील समाज वडारसमाज पुर्ण पणे उदरनिर्वाहावर अवलंबून आहे, त्यासाठी त्याना गावोगावी भटकंती करुन पोट भरावे लागल्याने शासनाच्या कुठल्याच योजनेचा फायदा होत नाही. राजकीय पुढारी फक्त मतदान पुरतेच येऊन मत मागतात आणि मते एकदा मिळाली की, पुन्हा कुनीच फिरकत पण नाही.
त्यासाठी स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सदरील शासकीय योजना जन सामान्यांपर्यंत पोहचवण्यात हातबार लावावा आणि मुखेडच्या तालुक्याची सुरुवात असलेल्या वडारवाडीतील नागरिकांना शासकिय योजनांचा लाभ मिळवून द्यावा ही विनंती समस्त वडार समाजाची अपेक्षा आहे.