शैक्षणिक

एच.एस.सी व एस.एस.सी परिक्षा 2024 पेपर तपासणीवर शिक्षक समन्वयक संघाचा बहिष्कार

Spread the love

 

घाटंजी तालुका प्रतिनिधि- सचिन कर्णेवार
घाटंजी- महाराष्ट्रात एकूण 63000 प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी 20% 40% 60% अनुदान तत्वावर काम करत असून त्यांना पुढील वाढीव टप्पा वाढ मिळण्याकरिता दिवाळीच्या सुट्टीच्या काळात आंदोलन व आमरण उपोषण कऱण्यात आले होते त्या वेळेस शिक्षण मंत्री मा. केसरकर साहेबांनी आंदोलनाला स्वतः भेट देउन उपोषण सोडविले व टप्पा वाढीचे लेखी पत्र देऊन दिवाळी गोड करा असे म्हटलें होते परंतू शिक्षणमंत्र्यांनी आपला शब्द फिरविल्यामुळे पुन्हा दिनांक 03 जानेवारी 2024 पासून शिक्षक समन्वयक संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन आझाद मैदान मुम्बई येथे सुरू केले असून सदर आंदोलनाची दखल राज्य सरकारने अजूनही घेतली नाही त्यामुळे राज्यभर शिक्षणक्षेत्राशी संबंधीत अधिकाऱ्यांना व मंत्र्यांना निवेदन देण्यात आले. त्याचप्रमाणे घाटंजी तालुका शिक्षक समन्वयक संघाचे श्री. एम. जे. पटेल सर, संदीप नडपेलवार सर, मोहुरले सर, उमेश मराठे यांनी एसएससी व एचएससी परिक्षा 2024 च्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकल्याचे निवेदन घाटंजी येथील निवासी नायब तहसीलदार श्री.मेढे साहेब यांना दिले.
००००००००००००००

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close