जागेचे पट्टे नावे करून देण्याची मागणी

घाटंजी तालुका प्रतिनीधी/ सचिन कर्णेवार.
घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील रस्त्याच्या दोनी बाजूला मोठ्या प्रमाणात छोटे दुकान असून याच दुकानाच्या भरोसे त्याच्या कुंटूबातील सदस्याचा उदरनिर्वाह चालवत मात्र गेल्या दोन तिन दिवसा अगोदर बांधकाम विभागाकडून अतिक्रमण बाबत संबंधित दुकानदारस नोटीसा प्राप्त झाले आहे. यामुळे आमच्यामध्ये आता आमच्यावर परिवार उदर निर्वाह समस्या उभि आहे. सदर दुकान जागेचे आम्ही गेल्या तिस वर्षापासुन ग्रामपंचायत ला कर भरत असून मात्र आमच्या नावाने पट्टे नसल्याने वारंवार अतिक्रण हटावो मोहीमच कारण देत आमच्यावर अन्याय होतोय आता शासन नियमानुसार आमच्या दुकान जागेचे पट्टे आमच्या नावाने करून द्यावे अशी मागणी कुर्ली येथील सर्व व्यापा-यांनी तहसिलदार घाटंजी मार्फत उपविभागीय अधिकारी पांढरकवडा यांना निवेदन दिले असून या निवेदन म्हटले आहे की, बांधकाम विभागाने आमचे दुकाने हटविल्यास आमच्या सह आमच्या कुंटूबातील सदस्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते यामुळे उपविभागीय अधिकारी यांनी आम्हांला न्याय द्यावा.ही मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देतेवेळी आकाश आत्राम, गुलाब मडावी, सय्यद मुस्ताफ शेख, जब्बार फ्रपूल पोलासवार, नागोराव आत्राम, नरेश रूद्राक्षवार, शेख मोसीन शेख, अब्दूल गफूर अक्षय गड्डमवार ,अमोल जैस्वाल, तेजस जैस्वाल सह दुकानदार बहुसंख्येने उपस्थित होते.