ब्रेकिंग न्यूज
सेल्फी च्या नादात नवविवाहितेने गमावला जीव
20 दिवसांपूर्वी झाले होते लग्न
पनवेल / नवप्रहार मीडिया
लग्नानंतर हनिमून साठी गेलेल्या कपल पैकी पत्नीला सेल्फी चा मोह न आवरल्याने ती पाय घसरून खोल दरीत पडल्याने तिचा मृत्यू झाला आहे.२८ डिसेंबर रोजी ही घटना घडली असून शुभांगी विनायक पटेल (24) असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. ती पतीसोबत ट्रेकिंगला गेली होती. तेव्हा सेल्फी काढत असताना खाली पडून तिचा मृत्यू झाला. हे कपल प्रबळगडावर ट्रेकिंग साठी गेले होते.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुभांगी पटेल आणि विनायक यांचे वीस दिवसापूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर दोघे लोणावळा येथे हनिमून साठी 28 डिसेंबर रोजी गेले होते. त्या ठिकाणाहून ते दुपारी 2 च्या सुमारास माची प्रबळ येथे ट्रेकिंगसाठी गेले. यावेळी शुभांगी सेल्फी काढत असताना तिचा पाय घसरला आणि ती वरून खाली पडली. हा सर्व प्रकार विनायक याच्या डोळ्यादेखत घडला.
शुभांगी अंदाजे दीड ते दोन हजार फूट खाली कोसळली असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या महिलेला पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील आणि त्यांची शेडुंग चौकीचे कार्यरत पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांच्या,स्थानिकांच्या आणि निसर्ग मित्र यांच्या मदतीने या महिलेला बाहेर काढण्यात आले. यावेळी फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आले होते. तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी रात्री आठच्या सुमारास मृत घोषित केले.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1
1