सोशल मीडियावर बऱ्याच प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.त्यात काही स्टंस्ट बाजींचे देखील असतात. पण स्टंट बाजींचे व्हिडीओ हे तरुण पिढीचे असतात. सध्या सोशल मीडियावर एका आजीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात आजी स्टंट करतांना दिसत आहे. आजीच्या या व्हिडीओ ने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
या व्हिडिओमध्ये आजीबाईंनी मोठा कहर केलाय. त्यांनी आनंद व्यक्त करण्यासाठी हातामध्ये चक्क फटाक्यांची पेटलेली माळ घेतली आहे. फटाके फुटत असताना या आजीबाईंनी माळ सोडून दिलेली नाही. त्या ती माळ घेऊन घरासमोर असलेल्या रस्त्यावर पुढे मागे आणि गोल फिरत आहेत. एखादं लहान मुलं सुरसुरी घेऊन जशी मजा करतात अगदी त्याच पद्धितीने या आजीने स्टंट केला
अनवाणी पायांनी केला स्टंट
फटाके फोडत असताना नेहमीच पायात चप्पल घातलेली असावी. कारण खाली पडलेल्या ठिणगीवर पाय पडल्यास त्याने मोठ्या प्रमाणावर पाय भाजला जाण्याची शक्यता असते. मात्र या आजीबाई कशालाही घाबरत नाहीत. त्या अगदी बिंधास्त अनवाणी पायांनी रस्त्यावर फटाके घेऊन उतरल्या आहेत.
आजीचा हा स्वॅग पाहून भल्याभल्यांना घाम फुटलाय. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अशा प्रकारे फटाके फोडत असताना या आजीबाईंना कोणतीही भीती वाटत नाही.फटाक्यांची माळ असल्याने त्याचा मोठा आवाज होतो आणि काही ठिणग्या देखील त्यांच्या अंगावर उडतता. मात्र एखाद्या भाईलाही लाजवेल असं काहीसं या आजींनी केलं आहे.
सोशल मीडियावर आता या आजींची मोठी चर्चा रंगली आहे. या आजी नेमक्या कोण आहेत? त्या कुठे राहतात असा प्रश्न नेटकरी विचारतायत. तसेच काहींनी कमेंटमध्ये या कॉलेजच्या बॅक बॅन्चर आणि मस्तीखोर मुंलींपैकी एक असतील असं म्हटलं आहे. आजीचा अनोखा अंदाज पाहून नेटकऱ्यांनी यावर हसण्याचे इमोजी देखील शेअर केले आहे. @evershining_media या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून आतापर्यंत २ लाखांहून अधिक व्हुव्ज या व्हिडिओला मिळाले आहेत
.