हटके

वयाच्या 40 व्या वर्षी ती आहे 44 मुलांची माता

Spread the love

वयाच्या 12 व्या वर्षीच झोले होते  लग्न 

4 वेळा दिला 5 मुलांना जन्म

इम्पाल (युगांडा ) / नवप्रहार डेस्क

                  लग्नानंतर आई होणे ही प्रत्येक महिलेची इच्छा असते. वर्तमान काळातील महिला एक किंवा जास्तीत जास्त दोन  मुलांवर समाधान मानतात. काही महिला  यापेक्षा जास्त अपत्य जन्माला घातलात. पण आम्ही आज ज्या महिले बद्दल तुम्हाला सांगणार आहोत तिने अवध्या वयाच्या 40 वर्षात 44 मुलांना जन्म दिला आहे. मुख्य म्हणजे ती एकटीच या मुलांचे संगोपन करीत आहे.

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार या महिलेचे नाव मरियम नबतांझी (Mariam Nabatanzi) असे आहे. ती युगांडा या आफ्रिकन देशातील आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या महिलेच्या आयुष्यात आतापर्यंत एकच प्रसंग आला आहे जेव्हा तिने फक्त एका मुलाला जन्म दिला आहे. नाहीतर प्रत्येक वेळी गरोदर असताना तिने किमान दोन मुलांना जन्म दिला आहे.

ऐकून अपत्यांपैकी 6 मुलांचा झाला मृत्यू

वृत्तानुसार, या महिलेच्या आयुष्यात असे 4 प्रसंग आले आहेत जेव्हा तिने प्रत्येकी पाच मुलांना जन्म दिला आहे. तर पाच वेळा तिने तीन मुलांना आणि चार वेळा जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. मात्र, तिच्या 44 मुलांपैकी 6 मुलांचा काही कारणाने मृत्यू झाला आहे. सध्या ती 38 मुलांचे संगोपन करत आहे, ज्यामध्ये 18 मुली आणि 20 मुले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे ती या सर्व मुलांचे संगोपन एकटीच करत आहे. 2016 मध्ये या महिलेचा नवरा घरातून सर्व पैसे घेऊन पळून गेला होता.

12 व्या वर्षी झाले होते लग्न

न्यूयॉर्क पोस्टनुसार, मेरीचे लग्न अवघ्या 12 व्या वर्षी झाले होते. वास्तविक, तिच्या आई-वडिलांनी तिला लग्नाच्या बहाण्याने विकले होते. अशा परिस्थितीत वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी तिने पहिल्या मुलाला जन्म दिला आणि तेव्हापासून तिने 44 मुलांना जन्म दिला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close