होली फेथ इंग्लिश प्राइमरी स्कूल मध्ये सावित्रीबाई फुले जयंतीला टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू व विज्ञान प्रदर्शनी सपंन्न
प्रतीनीधी बाळासाहेब नेरकर कडून
होली फेथ इंग्लिश प्रायमरी स्कूल च मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी व सोबतच टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू आणि विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाबद्दल प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तेल्हारा पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ .प्रतिभा सतीश इंगळे तसेच विज्ञान प्रदर्शनी निरीक्षक म्हणून लाभलेले सौ विद्या संतोष कुमार राऊत मॅडम व संजीवनीताई प्रशांत इंगळे मॅडम ह्या होत्या प्रमुख अतिथी म्हणून हिवरखेड पोलीस स्टेशन मधून दामिनी पथकाच्या सुनिता डाहे मॅडम हेड कॉन्स्टेबल होत्या तसेच प्रमुख अतिथी म्हणून जगन्नाथ महाकाळ सतीश दादा इंगळे गावचे पोलीस पाटील प्रकाशजी गावंडे ,डॉक्टर धुळे, डॉक्टर इंगळे, अरुण राहणे उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनी व टाकावु पासून टिकाऊ वस्तू निर्मिती करता विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका कल्पना अस्वार मॅडम यांनी केले. संचालन प्रज्ञा गवई मॅडम नी केले तर आभार प्रदर्शन वालचाळे मॅडम यांनी केले
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी रहाटे मॅडम शेळके मॅडम,कुऱ्हाडे मॅडम अग्रवाल मॅडम सोनोने मॅडम,मानकर मॅडम, ठेंगेकर ताई वाईकर तसेच राजाराम भाऊ इंगळे आदींनी परिश्रम घेतले .