क्राइम

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सेफ्टी टॅंक मध्ये आढळला तरुणीचा मृतदेह

Spread the love
 
चेहरा विटांनी होता ठेचला ; तर हात होता मोडला
 

फतेहपूर / नवप्रहार वृत्तसेवा 

        ललौलीतील बस्तापूर येथे एका इमारतीच्या सेफ्टी टॅंक मध्ये तरुणीचा  विवस्त्र मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. सदर तरुणीची ओळख पटवण्याचे काम सुरू असून तिचा चेहरा विटांनी ठेचण्यात आल्याने आणि एक हात तुटला असल्याने बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला असून घटनास्थळी  दाखल झालेल्या फॉरेन्सिक टीमने काही नमुने गोळा केले आहेत.
               

याबाबत मिळालेली माहिती अशी की, राधानगर इथ राहणाऱ्या राकेश गुप्ता यांचे ललौलीतील बस्तापूर इथं एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हे काम बंद आहे. बांधकामाजवळच एक सेफ्टी टँकही आहे. शनिवारी सकाळी गावातील लहान मुलं खेळायला गेली असताना तिथे एक मृतदेह दिसून आला. याची माहिती स्थानिकांना मिळताच त्यांनी पोलिसांना कळवले.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून तरुणीचा चेहरा विटांनी ठेचण्यात आला आहे. दोन विटांना रक्त लागलं होतं. तरुणीचा हातही तुटला होता. एका प्लास्टिक पिशवीत समोसे होते. याशिवाय आजूबाजूला साडी, काही केस आणि फुटलेल्या बांगड्याही होत्या.

एएसपी विजय शंकर मिश्रा यांनी सांगितलं की, ललौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आबू मोहम्मदपूर गावात राकेश गुप्ता यांच्या घऱाचे बांधकाम सुरू आहे. त्याच्या समोर असलेल्या सेफ्टी टँकमध्ये एका २५ वर्षांच्या तरुणीचा मृतदेह आढळला आहे. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पंचनामा कऱण्यात आला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमने काही नमुने गोळा केले आहेत. याप्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली असून अधिक तपास केला जात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close