राजकिय

लक्ष्मण हाके यांनी या उमेदवाराला पाडण्याचे दिले चिथावणी

Spread the love

पुणे / नवप्रहार डेस्क 

                         मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरल्याने त्यांची ओळख मराठा नेते म्हणून झाली आहे. या विधानसभा निवसणुकीत त्यांनी उमेदवार उभे करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीं देखील आम्ही देखील या उमेदवारांना पाडणार आहोत असे अल्टीमेटम दिले आहे. यावेळी त्यांनी या निवडणुकी नंतर जरांगे इतिहास जमा होतील असे टीकास्त्र देखील सोडले आहे.

मनोज जरांगे यांची यादी जाहीर केल्यानंतर आम्ही ओबीसी आघाडीची यादी जाहीर करणार असल्याचे हाके यांनी सांगितले.

लिस्टमधील ‘या’ नेत्यांची नावे केली जाहीर
आमची यादी तयार आहे. फक्त जरांगे पाटलांच्या यादीची वाट पाहत आहोत. या निवडणुकीत रोहित पवार, राजेश टोपे, तानाजी सावंत, मोनिका राजळे हे आमच्या हिटलिस्टवर आहेत. त्यांना आम्ही पाडणारच आहोत असे लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.

जरांगेना लगावला टोला
या निवडणुकीत कुणाला पाडायचं आणि कुणाला निवडून आणायचं याच्या याद्या तयार झाल्या आहेत. पत्रकार परिषद घेऊन 4 नोव्हेंबर नंतर आम्ही यादी जाहीर करू. जरांगे यांची उमेदवार यादी जाहीर झाली की आमचीही ओबीसी आघाडीची यादी लगेच जाहीर करू. जरांगेच्या एमडीएमचं काही खरं नाही. उद्याच आरएमडी देखील म्हणतील, असा टोलादेखील लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेना लगावला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close