मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डॉ नीलम गोऱ्हे यांनी केला सत्कार.
राज्यातील सर्व मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही अत्यंत स्वागतार्ह बाब – नीलम गोरे
तसेच राज्यसभेच्या महायुती च्या ४ नवीन उमेदवारांचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केला सत्कार.
मुंबई (विशेष प्रतिनिधी )
राज्यातील सर्व मुलींचे पदव्युत्तर पर्यंतचे शिक्षण मोफत केले आहे. याबाबत नुकतेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी शासनाचे धोरण जाहीर केले आहे. याचा लौकरच शासन निर्णय येत आहे. मुख्यमंत्री ना एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे मुलींच्या शिक्षण व सक्षमीकरणामधे मोलाची भर पडणार आहे.
आज विधानभवनात या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व श्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार डॉ नीलम गो-हे उपसभापती विधानपरिषद यांनी केला. या ऐतिहासिक निर्णयासाठी त्यांचे तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले.
यावेळी राज्यसभा निवडणुकीचे उमेदवार अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, मेधा कुलकर्णी, डॉ गोपछडे यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मंत्री शंभूराज देसाई, तानाजी सावंत, दिपक केसरकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार प्रताप चिखलीकर,आमदार भरत गोगावले, प्रसाद लाड,विप्लव बजोरिया, माजी आमदार अमर राजुरकर, राम रातोळीकर,संजय शिरसाट,बालसंरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाह हे हजर होते.