स्कूल ऑफ स्कॉलर्स प्राथमिक “राष्ट्रीय डॉक्टर्स दिवस” मोठ्या उत्साहात साजरा
धामणगाव रेल्वे: / प्रतिनिधी
श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शिक्षण संस्था संचलित द्वारा स्कुल ऑफ स्कॉलर्स मध्ये “राष्ट्रीय डॉक्टर्स दिवस” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका के. साई नीरजा मॅडम , पर्यवेक्षिका शबाना खान उपस्थित होत्या. आणि सर्व शिक्षकगण उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दिपाली वाटाणे उपस्थित होत्या. वर्ग दहावीची विद्यार्थिनी पूर्वा घुंगरुड हिने कार्यक्रमाचे संचालन केले.तर विज्ञान शिक्षक विश्वास हींगवे यांनी आभाप्रदर्शन केले. डॉक्टर्स दिवसाबद्दल डॉ. दिपाली वाटाणे मॅम यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका के. साई नीरजा मॅम यांनी सुद्धा विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका के . साई नीरजा मॅडम तसेच ऑर्गेनाईजेशन कमिटी सदस्य प्रदीप मांडवकर , नितीन श्रीवास , मयुरी लांजेवार व रेड हाऊस सदस्य स्नेहा राजपूत, हिंदी शिक्षिका चंचल इंगोले , ग्रंथालय शिक्षक प्रविण टोंगे , समाजशास्त्र शिक्षक हर्षल मनोहर , विज्ञान शिक्षक विश्वास हींगवे , गणित शिक्षिका कांचन उके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रमाला यशस्वी करण्यात आले.