क्राइम

गुंगीचे औषध देऊन शिक्षकानेच केला विद्यार्थिनींवर बलात्कार 

Spread the love

कोरपना (चंद्रपूर) / विशेष प्रतिनिधी

                 उन्हाळ्याच्या सुटीत एक्सट्रा क्लास च्या नावाने बोलावून विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर शिक्षकानेच बलात्कार केल्याचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे घडला आहे. घटनेची वाच्यता न करण्यासाठी त्याने तिला धमकावले होते. त्यामुळे या 11 वर्षीय मुलीने मे महिन्यात झालेल्या अत्याचारा बद्दल मैत्रिणी शिवाय कोणाला सांगितले नव्हते. मैत्रिणीने तिच्या आईला सांगितल्या वर काल (1ऑक्टोबर) ला शिक्षक अमित लांडे याच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीची माहिती मिळताच शिक्षक फरार झाला होता. फरार शिक्षकाला आज पहाटे अकोल्यात अटक करण्यात आली.

 मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी एक्स्ट्रा क्लास करण्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये शाळेत जात होती. इतरही विद्यार्थी या वर्गाला यायचे. आरोपी शिक्षक अमीत लोडे हा वर्ग घ्यायचा.

एके दिवशी त्याने पीडित मुलीला कार्यालयात बोलावून तिला गुंगीच्या गोळ्या दिल्या आणि तिच्यावर अत्याचार केला. मुलगी शुद्धीवर आल्यावर घडलेली गोष्ट घरी सांगू नये म्हणून त्याने मुलीला धमकी दिली. त्यामुळे ही मुलगी गप्प राहिली. पण तिने हा प्रकार वर्गातील मैत्रिणीला सांगितला होता.

या मैत्रिणीने तिच्या आईला हा प्रकार आता सांगितल्यावर पीडितेच्या आईने काल पोलिसात तक्रार दिली. त्यावरून आरोपी शिक्षकाविरोधात पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनंतर हा शिक्षक फरार झाला होता. मात्र बुधवारी पहाटे त्याला अकोला येथे पकडण्यात आले. आरोपी शिक्षक हा कोरपना येथे युवक काँग्रेसचा पदाधिकारी आहे.

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close