क्राइम

बोपदेव घटनेची मध्यप्रदेश मध्ये पुनरावृत्ती; पती सोबत गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार 

Spread the love

रिवा / नवप्रहार डेस्क 

            महाराष्ट्रात प्रियकरा सोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीवर प्रियकराचे हातपाय बांधून सामूहिक अत्याचार प्रकरण ताजे असतानाच मध्यप्रदेश च्या रिवा जिल्ह्यांत नवऱ्या सोबत फिरायला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघड झाली आहे.  

 माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी 100 हून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे, असे एका अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले

                      गुऱ्हा तहसीलमधील सहलीच्या ठिकाणी सोमवारी सामूहिक बलात्कार झाला. त्या महिलेचा नुकताच विवाह झाला आहे. ती व तिचे पती 19-20 वयोगटातील असून ते अजूनही महाविद्यालयात शिकत आहेत, असे रीवा मुख्यालयाचे पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) हिमाली पाठक यांनी वृत्तसंस्थेला दूरध्वनीवरून सांगितले.

सामूहिक बलात्कार प्रकरण अतिशय संवेदनशील असून पीडितेची ओळख उघड होणार नाही याची खात्री करण्यासाठी पोलिस काळजीपूर्वक प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून 100 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे, असे त्यांनी सांगितले. तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पाच जणांपैकी एकाच्या हातावर छातीवर टॅटू आहेत, असे पीडित महिलेने पोलिसांना सांगितले. सोमवारी ही घटना घडल्यानंतर मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास या जोडप्याने गुऱ्हाळ पोलिस स्टेशन गाठले. न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे कर्मचारी व मी घटनास्थळी पोहोचलो. पीडित महिलेची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली व त्याचदिवशी सायंकाळी सात वाजता एफआयआर नोंदवण्यात आला, असे हिमाली पाठक यांनी सांगितले.

पीडित महिलेने दिलेल्या बयाणाचा हवाला देत पाठक यांनी सांगितले की, गुऱ्हा औद्योगिक क्षेत्रातील एका प्रसिद्ध मंदिरापासून सुमारे २ कि. मी. अंतरावर असलेल्या कारंज्याजवळ तिचे तिच्या पतीसोबत भांडण झाले. जिल्हा मुख्यालयापासून सुमारे २० किमी अंतरावर असलेल्या कारंज्याजवळ पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला, असे पीडित महिलेने आपल्या निवेदनात सांगितले. आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. आम्ही १०० हून अधिक लोकांना व संशयितांना ताब्यात घेतले आहे. आमची चौकशी सुरू आहे. पाच अज्ञात व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेनुसार सामूहिक बलात्कार व इतर आरोपांसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close