फैजल कडून विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या महिलेने स्वतःची अशी केली सुटका

शितपेयात गुंगीचे औषध देऊन आणि व्हिडीओ बनवून केले लैंगिक शोषण
मुलाला आणि नवऱ्याला मारून टाकण्याची दिली धमकी
सांगली / नवप्रहार डेस्क
मागील काही काळापासून महिलां वरील अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. गुन्हेगारांना कितीही कडक शिक्षा केली तरी यात काहीच कमी आल्याचे दिसून येत नाही. उलट अश्या घटनेत वाढच होत आहे. काही धर्मांध तरुणां कडून महिलांना टार्गेट करून त्यांचे लैंगिक शोषण केल्या जात आहे. घटनेचा व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार लैंगिक शोषण करण्यात येते .
फैजल ने महिलेला शितपेयात गुंगीचे औषध देऊन महिलेचे लैंगिक शोषण करण्यात आले. त्याचे व्हिडीओ बनवण्यात आले. आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार तिच्यावर अत्याचार करण्यात आले. तिला कार मध्ये बसवून विक्रीसाठी घेऊन जात असताना प्रसंगवधान राखत महिलेने स्वतःची सुटका करून घेतली.
पीडित महिला ही परगावची असून, मार्च महिन्यात फजल याने तिला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. त्यामुळे पीडित महिला चक्कर येऊन बेशुद्ध पडली.
त्याचे व्हिडिओ चित्रण केले. तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मार्च ते सप्टेंबरदरम्यान पीडित विवाहितेशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्यात आले. त्यानंतर तिला हुबळी येथे विकण्यासाठी घेऊन जात असताना पीडित महिलेने मिरज येथे संधी साधून कारचा दरवाजा उघडून पलायन करून आपली सुटका करून घेतली.
या गुन्ह्याची नोंद शहर पोलिस ठाण्यात झाली असून, पोलिसांनी तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संशयित फजल पटेल (वय ३६, रा. काळे प्लॉट, १०० फुटी रोड, पाकिजा मशीदशेजारी), अल्फात करीम (३५, रा. सांगली), अल्फाज पटेल (रा. काळे प्लॉट) त्या संशितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार कोणाला सांगितलास तर तुझ्या मुलाला आणि नवऱ्याला मारून टाकीन, अशी धमकी दिली. जुलै महिन्यात फजल याने तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. सप्टेंबर महिन्यात पुन्हा फोन करून पीडित महिलेला सांगलीत बोलावून घेतले. तिला एका लाल रंगाच्या कारमध्ये बसण्यास सांगितले. तिने गाडीत बसण्यास नकार देताच, तिला पुन्हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे पीडिता गाडीत बसली. ती गाडी संशयित फजल याचा भाऊ अल्फाज हा चालवत होता.