निवड / नियुक्ती / सुयश

दिनेश लोंढे यांना भारतभूषण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

Spread the love
नगर – आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दुत संघटना व भारत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून मुंबई येथे सामाजिक क्षेत्रात केलेल्या उललेखनीय कार्याबद्दल यंदाचा मानाचा “भारतभूषण राष्ट्रीय पुरस्कार -2024” ने अहिल्या नगर येथील सामाजिक कार्यकर्ते शिवसेना अंगीकृत सेल शिव सामर्थ सेना अहिल्या नगर जिल्हा समन्वयक व श्रीकांत शिंदे फाउंडेशन समन्वयक दिनेश लोंढे यांना प्रदान करून सन्मानीत करण्यात आले.
       याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष अविनाश साकुंडे, राष्ट्रीय अध्यक्ष अफसर कुरेशी, अंधेरीच्या स्थानिक आमदार हारून शेख, एसीपी मुंबई पोलीस श्रीमती सुरेखा कपिले, बॉलिवूड अभिनेत्री श्रावणी गोस्वामी, मिस इंडिया 2024 पिया रॉय, महाराष्ट्र पर्यटन विभागाचे सौ प्रीती वनगे- पवार, WHRAF चे मुंबई सचिव श्री महेश आंब्रे, शिव सामर्थ सेना महाराष्ट्र अध्यक्ष शिव सेना नेते संदीप भोज इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते
     हा पुरस्कार मिळाल्याबद्दल दिनेश लोंढे यांचा जिल्हातील विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकिय क्षेत्रातून, अभिनंदन व सत्कार करण्यात येत आहे.
 आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दुत संघटना व भारत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून देण्यात येणारा भारतभूषण राष्ट्रीय पुरस्कार दिनेश लोंढे यांना प्रदान करण्यात आला.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close