क्राइम

AI ची मदत घेऊन स्वतःला महाविद्यालयीन विद्यार्थी दर्शवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार 

Spread the love

सिंधुदुर्ग / क्राईम रिपोर्टर

            एका 39 वर्षीय तरूणाने स्वतःचा AI ने फोटो बनवून इन्स्ट्रग्राम ग्राम वर अकाउंट उघडले.आणि एका अल्पवयीन मुलीला प्रेम जाळ्यात ओढले. आणि तिला भेटायला बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीची मासिक पाळी चुकल्याने कुटुंबियांना संशय आला.आणि त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर हा गलिच्छ प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

या प्रकरणी मालवण येथील संशयित महेंद्र गणपत घाडीगावकर (वय 39 वर्षीय ) या नराधमाला कणकवली पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेतील पीडित असलेल्या शालेय विद्यार्थिनीची मासिक पाळी चुकल्यानं घरच्यांना संशय आला व तिची विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर या सगळ्या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. त्यानंतर तातडीने कणकवली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

नेमकी घटना काय?

कणकवली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन विद्यार्थिनीची इन्स्टाग्रामवरील अकाउंटवरून या इसमाशी ओळख झाली होती. याच ओळखीचा गैरफायदा घेऊन आरोपीने विविध भुलथापा व अमिष दाखवून या विद्यार्थिनीला मोहात पाडून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर भेटण्याचं निमित्त करून तिला कणकवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका जंगलात आडवाटेला नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संशयित महेंद्र घाडीगावकर हा आरोपी मोलमजुरीचं काम करतो. 39 वर्षांचा असलेल्या या इसमाने आपण केवळ १७ वर्षाचाच महाविद्यालयीन तरुण असल्याचं भासवलं. जानेवारी 2026 मध्ये या इसमाची ओळख या पीडित मुलीशी झाली होती. त्यानंतर जुलै 2026 पासून 5 नोव्हेंबर या कालावधीत प्रत्यक्ष भेटीगाठी सुरू झाल्या. याचदरम्यान जंगलात आडवाटेला नेऊन पाच ते सातवेळा अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

AIच्या मदतीने चेहरा बदलला

या सगळ्या प्रकारची गंभीर दखल कणकवली पोलिसांनी घेतली आहे. कणकवली पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे यांनी तपासाची सूत्र फिरवत या संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे. मालवण येथील त्याच्या घरातून कणकवली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. हा संशयित इसम मंथन या नावानेही आणखी एक इंस्टाग्राम अकाउंट चालवत होता. या अकाउंटवर त्याने एआय (AI) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चेहरा बदलून तरुण वयातील सदृश्य चेहरा वापरला होता. सुरुवातीला त्याने दिशाभूल करणारी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, त्याचा फोटो संबंधित पीडित मुलीला दाखवताच तिने हा फोटो ओळखला व या इसमाचं खोटेपणाचं बिंग फुटलं. हा संशयित आरोपी एका बागेत मोलमजुरीच्या कामाला असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार ‘पोस्को’ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून संशयित इसमाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास कणकवली पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे करत आहेत. मात्र या धक्कादायक प्रकरणामुळे पालक आणि शालेय विद्यार्थिनी व विद्यार्थी यांच्या सोशल मीडियाच्या वापरावर पालकांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे. त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याजवळ संवाद साधणे आवश्यक असून यातील धोके त्यांना समजून सांगायची गरज आहे. सोशल मीडियाचा वापर करताना मोठी काळजी घेणे आवश्यक असल्याचं या घटनेवरून पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close