क्राइम

प्रियकराला प्रेयसीने खुर्चीत बांधून जिवंत जाळले 

Spread the love
बेंगरुळू / विशेष प्रतिनिधी 
 
            क्राईम करण्यात फक्त पुरुषच आघाडीवर आहेत असे नाही तर महिला सुद्धा क्राइम करण्यात पटाईत आहेत. महिलांकरवी खुनासारखे अनेक गंभीर गुन्हे घडल्याचे दिसून येते. नुकतेच छत्रपती संभाजी नगर येथे एका तरुणीने आपल्या प्रियकराच्या बायकोची हत्या केली आहे. तर पतीच्या अवैध संबंधामुळे महिलेने आपल्या सात वर्षाच्या पुसण्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. 
 
             या सगळ्या प्रकरणाला बेंगरुळू येथील एका तरुणीने आपल्या प्रियकराची हत्या करून फिके पाडले आहे. तिने प्रियकराला घरी बोलविले. त्याला पाश्चात्य देशांप्रमाणे प्रपोज करण्याचे सांगून त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला खुर्चीवर बसवून बांधले आणि जिवंत जाळले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकर वारंवार दुर्लक्ष करत असल्याने तरुणी नाराज होती. इतकंच नाही तर तरुणीने प्रियकर जिवंत जळत असताना त्याचा व्हिडीओ काढला आणि त्याला जिवंत मरताना पाहिलं.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, प्रेरणा आणि किरण दोघेही 27 वर्षांचे आहेत. ते दुकानात एकत्र काम करत होते. मागील एका वर्षापासून दोघे नात्यात होते. किरण आपल्याकडे हवं तितकं लक्ष देत नसल्याने प्रेरणा नाराज होती. तो आपल्याशी लग्न करु इच्छित नसल्याचंही तिला वाटत होतं.
प्रेरणा बंगळुरूच्या अंजनपुरा येथे वास्तव्यास आहे. ती आई आणि भावासोबत राहते. मंगळवारी घरी एकटी असताना तिने किरणला घरी बोलावलं होतं. किरण पोहोचल्यावर, दोघांनी काही वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर तिने किरणच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि एका खुर्चीवर बसवलं. हे सगळं करत असताना ती मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करत होती.

परदेशात मुली प्रपोझ करतात त्याप्रकारे करणार आहे

अधिकाऱ्याने सांगितलं आहे की, प्रेरणाने हात बांधण्यास सुरुवात केली असता किरणने आधी आक्षेप घेतला. यानंतर तिने आपण ज्याप्रकारे परदेशात मुली प्रपोझ करतात त्याप्रकारे तुला प्रपोझ करणार असल्याचं सांगितलं.

खुर्चीला बांधून पेटवून दिलं

हात-पाय बांधलेल्या आणि डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या अवस्थेत किरण प्रपोझची वाट पाहत होता. तर दुसरीकडे प्रेरणा हत्येची तयारी करत होती. प्रेरणाने आधीच ज्वलनशील पदार्थ आणला होती. तो तिने त्याच्या अंगावर ओतला आणि नंतर त्याला पेटवून दिलं.

दुर्लक्ष करत असल्याने केली हत्या

पोलिसांनी याप्रकरणी प्रेरणाला बेड्या ठोकल्या आहेत. “आम्ही त्या महिलेला ताब्यात घेतलं आणि चौकशी केल्यानंतर, तिने पेटवून हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. त्या दोघांचे प्रेमसंबंध होते आणि तो आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे, असे तिलं वाटत होतं,” असं पोलीस उपायुक्त डी.एल. नागेश यांनी सांगितलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close