क्राइम

वाचा  आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना का घालावी लागली पीपीई किट

Spread the love

जयपूर / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                     पीपीई किट हा शब्द ऐकला की अंगावर अक्षरशः शहारे उभे राहतात. कारण या शब्दा मुळे कोरोना काळाची आठवण होते. ज्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. राजस्थान मध्ये घडलेल्या एका आरोपीला पकडण्यात आल्यावर पोलिसांनी अर्जंट पीपीई किट घातली कारण …….

राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील सेंदला पोलीस स्टेशन परिसरात एका वृद्ध महिलेची हत्या करून तिचा चेहरा ओरबडल्याचा आरोप असलेल्या तरुणाला पोलिसांनी अटक करून जोधपूरला आणलं. आरोपीला जोधपूरला आणण्यात आलं तेव्हा पोलीस कर्माचाऱ्यांनी पीपीई किट घातलं होतं. या आरोपीला रेबीजची लागण झाल्याची शक्यता आहे. या तरुणाच्या संपर्कात आलेल्या सर्वांना अँटी रेबीज डोस देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी 26 मे रोजी पाली जिल्ह्यातील सेंदला पोलीस स्टेशन परिसरात एका वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली होती.

खून करणाऱ्या या तरुणाने महिलेचा चेहरा दगडाने ठेचला होता. महिलेचा मृत्यू होताच आरोपी तरुणाने मृत महिलेचा चेहरा ओरबाडला आणि तिचं मांस खाल्लं. ही घटना पाहिल्यानंतर लोकांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.

यानंतर तरुणाने तिथून पळ काढला. मात्र पोलिसांनी अथक प्रयत्न करून लोकांच्या मदतीने त्याला पकडलं.  तरुणाला पकडल्यानंतर त्याची झडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात मुंबईचं रेल्वेचं तिकीट आढळून आलं. त्यासोबत एक आधार कार्ड सापडलं आहे.

याशिवाय त्याच्या खिशातून रेबीजची काही औषधं जप्त करण्यात आली असून आरोपी तरुणाला लॉकअपमध्ये नेलं असता त्याने तेथील काही पोलिसांना चावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला पाली येथील बांगर रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे या तरुणाला रेबीजची लागण झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. त्यानंतर आरोपी तरुणाला जोधपूरला रेफर करण्यात आलं.

शनिवारी, जेव्हा आरोपी तरुणाला जोधपूरला आणलं जात होतं, तेव्हा पोलिस कर्मचाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून पीपीई किट घातले होते. या तरुणाच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना अँटी रेबीज डोस देण्यात आला आहे. आरोपीला प्रथम जोधपूरच्या महात्मा गांधी रुग्णालयात आणण्यात आलं. त्यानंतर त्याला जोधपूर येथील मथुरादास माथूर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
2

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close