शेतातील मोटर केबल चोरणारी टोळी शिरजगाव कसबा पोलिसांच्या ताब्यात
प्रतिनिधी मुबीन शेख. शिरजगाव कसबा
अमरावती जिल्ह्यात येणारे शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन येथे दि ०९/०२/२०२३ रोजी फिर्यादी अतुल सुदामर्पत खापरे वय ३५ वर्ष धंदा शेती. रा.सर्फापुर कल्होडी यांनी रिपोर्ट दिला की त्यांचे पांढरी शेत शिवारात असलेल्या शेतातील बोरींग मोटरचा केबल व शेजारी असलेले शेतकरी अभय चक्रधरपंत घुलक्षे तसेच शुभम विजयराव धुलक्षे, श्रिकांत नंदकुमार धुलक्षे, निखील अजयपत घुलक्षे, शिरीष महोदवराव घुलक्षे, अजिक्य रमेशपंत चर्जन यांचे शेतातील विहीरीतील मोटर व बोरींग मोटरला असलेला एकुन ६४० फुट केबल अंदाजे किंमत १५९०० रू चा कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या बाबत फिर्यादीने पोलीस स्टेशन शिरजगाव येथे तक्रार दिल्यावरून कलम ३७९ भा द वि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
पोलीस स्टेशन शिरजगाव हदिदत मागील काही दिवसापासुन जंगल परीसरालगत शेतातील केबल चोरीच्या घटना घडत होत्या परंतु आरोपी बाबत कुठलिही माहीती मिळत नसल्याने सदर आरोपीना पकडण्याचे आव्हाण पोलीसांपुढे होते वरीष्टांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन शिरजगाव येथे सदर आरोपींताची माहीती काढुन शोध घेवून आरोपी अटक करून गुन्हे उघडकिस आणणे करीता एक विशेष पथक गठीत करण्यात आले होते पथकातील अधिकारी अंमलदार यांनी मागील एक महिण्यापासुन शेतातील केबल चोरी करणा-या आरोपी बाबत माहीती गोळा करीत असताना पाळा येथील आरोपी हेमराज गुलाबराव राजने रा. पाळा यांचेवर संशय निर्मान झाला पथकातील अधिकारी अंमलदार यांनी आरोपी हेमराज राजने यांचे बाबत इंत्यमभुत माहीती गोळा करून त्याचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन आरोपी हेमराज गुलाबराव राजने यास ग्राम चिखली तालुका धारणी येथुन ताब्यात घेतले त्यास गुन्हयासंबधाने विचारपुस केली असता त्यांने त्यांचे साथिदार रामविलास उर्फ बिल्ला रामदयाल बारस्कर, बाबु सतीश बारस्कर, गणेश उर्फ कालु सुखराम भुस्कडे, सुरेश गंगाराम पानसे, यांचे सोबत पोलीस स्टेशन शिरजगाव कसबा हदिदतील ब-याच शेतामधील केबलची चोरी केल्याचे कबुल केले त्यावरून हेमराज गुलाबराव राजने व त्याचे साथिदार अमोल उर्फ बाबु सतिश बारस्कर वय २८वर्ष, गणेश उर्फ कालु सुखराम भुस्कटे वय २५ वर्ष दोन्ही रा. पाळा यांना गुन्हयामध्ये दि १३/०५/२०२३ रोजी अटक करून आरोपीतांचा दि. १७/०५/२०२३ पर्यन्त पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला असता पोलीस कोठडी रिमांड दरम्यान आरोपींतानी पोलीस स्टेशन शिरजगाव कसबा हदिदत पाच वेळा केबल चोरी केल्याचे कबुल केले आरोपींताकडुन पाचही गुन्हयातील चोरी करून जाळलेला १७ किलो ताब्याचा तार किंमत १७००० रू चा जप्त केला असुन आरोपीता कडुन आज पर्यन्त पाच गुन्हे उघडकिस आले आहे सदर गुन्हयातील आरोपी रामविलास उर्फ बिल्ला रामदयाल बारस्कर तसेच सुरेश गंगाराम पानसे दोन्ही रा. पाळा हे फरार असुन त्यांचा कसोशिने शोध घेणे सुरू आहे सदर आरोपी यांचे कडुन अजुन गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे.
सदर ची कार्यवाही मा.अविनाश बारगळ पोलीस अधिक्षक अमावती ग्रामिण मा.शशिकांत सांतव अप्पर पोलीस अधिक्षक अमरावती ग्रामिण मा. अतुलकुमार नवगिरे उपविभागीय पोलीस अधिकारी अचलपुर यांचे मार्गदर्शनाखाली शिरजगाव कसबा चे ठाणेदार प्रशांत गिते पोलीस हेड कॉन्स्टेबल नानकराम जावरकर मनोज पंडीत, दिपक डाहे, दिपक गवई वैभव माडवगणे अभय हरदे चालक, अर्जुन परीहार, रमेश आढवले, अजय कुमरे व पोलीस स्टेशन शिरजगाव कसबा यांनी केली.