अपघातास कारणीभूत ठरलेल्या आणि बंदी असलेल्या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई
तिवसा / मंगेश वाघ
न्यायालयाच्या आदेश्याला न जुमानता मोठया प्रमाणात मांजा विक्री सुरु असून अनेक मांजा मुळे अपघात झाले आहे, या प्रकरणावर लक्ष देऊन तिवसा पोलिसांनी तिवसा घरात जाऊन नायलॉन मांजा जप्त केला असून गुन्हा दाखल केला आहे,श्याहादात खा पठाण (41वय )इंदिरा गांधी नगर तिवसा,अशे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे,
मकर संक्रन्तीच्या पर्वावर पतंगाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून नायलॉन मांजा ची विक्री मोठया प्रमाणात होत असून मांजा मुडे अनेक अपघात होत आहे परंतु हा छंद अनेकांचे अपघात घळून आणत आहे तसेच पक्ष्याच्या जीवितला सुद्धा धोका झाला आहे या नायलॉन मांजा वर न्यायालयाने बंदी घातली असून मांजा ची खुलेआम विक्री होत असल्याचे पाहून तिवसा पोलिसांनी कारवाही केली असून आरोपीला अटक केले आहे
पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कार तिवसा, यांच्या मार्गदर्शन खाली पी, एस,आय,पिसाळकर, अरविंद गावंडे (Hc),प्रदीप मस्के,महेश काळे,वैशाली शिंगाळे यांनी कारवाही केली