सामाजिक
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विनम्र अभिवादन
यवतमाळ / प्रतिनिधी
स्थानिक देवराव पाटील विद्यालय वडगाव रोड यवतमाळ येथे 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्री बाई फुले जन्मदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करण्यात आले सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो याप्रसंगी बालिकांचे अभिनंदन कौतुक करण्यात आले या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका आशाताई गिरी ज्येष्ठ शिक्षिका विद्याताई चौधरी व शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी सर्व विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सावित्रीबाईं फुले यांचे प्रतिमेला विनम्र अभिवादन केले याप्रसंगी मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल त्यांनी केलेले समाजकार्य शैक्षणिक कार्य तसेच समाजातील अंधश्रद्धविरुद्ध दिलेला लढा याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुजाता गेडाम यांनी केले*
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1