पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी
हिवरखेड: (मोर्शी) / जितेंद्र फुटाणे
-येथील नागोराव दादा सदाफळे नवोदय विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये नुकतीच पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे कलाध्यापक श्री प्रल्हाद बुले यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले. सर्वप्रथम अध्यक्षांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कु. स्वरा भुजाडे, कु. मानवी सदाफळे,कु. धरती पाटील , तन्मय महल्ले, मयूर सावरकर, हर्षल पाचारे या विद्यार्थ्यांची तसेच श्री महादेव नागदेवे, कु .सुनीता श्रीवास ,प्रल्हाद बुले इत्यादी शिक्षकांची नेहरूंच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महादेव नागदेवे यांनी केले . याप्रसंगी श्री संजय बोनडे, उमेश चव्हाण, श्रीकांत विघे, निलेश रायचुरा, कु. स्वाती पारिसे, अशोक डवरे, दिलीप अजमिरे इत्यादी शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.