राजकिय

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी ने केली उमेदवाराच्या नावाची घोषणा 

Spread the love
मुंबई /विशेष प्रतिनिधी 
               मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटात विधान परिषदेसाठी उमेदवाराच्या नावाला घेऊन खलबत सुरू होत. अखेर आज झिशान सिद्दिकी च्या नावावर एकमत होऊन झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

अनेक नावे याकरिता चर्चेत होती. शेवटी आता झिशान सिद्धीकी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेसाठी झिशान सिद्धीकी यांना उमेदवारी मिळाली आहे. काल सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक बैठक पार पडली. काही नावे चर्चेत होती. अनेक जण याकरिता इच्छुक होते. शेवटी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून झिशान सिद्धीकी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

मुळात म्हणजे विधान परिषदेसाठी झिशान सिद्धीकी यांचे नाव अगोदरपासून चर्चेत होते. पण काही ज्येष्ठ नावांचीही चर्चा होती. यामुळे झिशान सिद्धीकी यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार की नाही असा प्रश्न होता. शेवटी अनेक मोठ्या घडामोडींनंतर झिशान सिद्धीकी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत उमेदवारीच्या मुद्द्यात बैठक सुरू होती.
रात्रीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेच्या उमेदवारीच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता होती. मात्र, शेवटी नावाची घोषणा करण्यात आली. बाबा सिद्धीकी यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून झिशान सिद्धीकी यांना उमेदवारी मिळू शकते, असे सुरूवातीपासूनच सांगितले जात होते. बिश्नोई टोळीने गोळ्या झाडून बाबा सिद्धीकी यांची भर रस्त्यावर मुंबईत हत्या केली.
एकदम कमी वयात झिशान सिद्धीकी यांना पक्षाकडन मोठी जबाबदारी देण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडूनही पहिली पसंती झिशान सिद्धीकी यांच्याच नावाला असल्याचे सांगितले जाते. यासोबतच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनीही झिशान सिद्धीकी यांच्या नावाकरिता आग्रह धरल्याची माहिती कळत आहे. अनेक जण इच्छुक होते. प्रत्येकजण आपआपल्या परिने विधान परिषदेची उमेदवारी मिळवण्याकरिता प्रयत्न करत होते. शेवटी आज नावाची विधान परिषदेच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close