क्राइम

मुलीच्या तसल्या कृत्याने संतापलेल्या पित्याने केली मुलीची हत्या

Spread the love
मध्यप्रदेशातून मृतदेह बुलढाणा जिल्ह्यात आणून जाळले 
शिर धडावेगळे करत.आणि कान, नाक कापून ओळख मिटविण्याचा केला प्रयत्न 
बुलढाणा / विशेष प्रतिनिधी 
                लेकीचे जावयासोबत असलेले मुलीचे अनैतिक सबंध कसेबसे तोडून तिच्यासाठी वडील योग्य स्थळ पाहत असताना तिचे चुलत भावासोबत सूत जुळले. त्यामुळे पित्याने तिचे लग्न अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे जुळविले. लग्न झाल्यानंतर मुलगी सहा दिवसांनी माहेरी आली. यावेळी घरातील पाहुणे बाहेर झोपले असताना ती घरात चुलत भावासोबत नको त्या अवस्थेत आढळली. त्यामुळे संतापलेल्या बापाने तिचा खून केला. सगळे पुरावे नष्ट करण्याचा त्याने प्रयत्न केला.पण शेवटी तो पोलिसांच्या कचाट्यात सापडलाच.
नेमकं घडलं काय?
26 एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव तालुक्यातील राजुरा शिवारात शीर कापून अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका तरुणीचा मृतदेह आढळला होता. शीर पूर्णतः जळालेले, अंगावरचे निशान सुद्धा मिटवलेले होते. त्यामुळे अशा परिस्थितीत मृतदेहाची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. शिवाय हा खून कोणी केला? त्याचाही शोध घ्यायचा होता.
मध्य प्रदेशात मिसिंग तक्रार
मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी कोणताही ठोस पुरावा मिळत नव्हता. अशातच 1 मे रोजी म्हणजेच घटनेच्या सहाव्या दिवशी मध्यप्रदेशातील खकनार पोलीस स्थानकात 27 वर्षीय शिवानीच्या मिसिंगची तक्रार दाखल झाली. तिच्या वडिलांनी बापूराव नत्थू कळमेकर (वय 55) यांनीच तक्रार दाखल केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे यांना मिळाली. त्यानंतर लगेचच सपकाळे यांनी पथकासोबत मध्य प्रदेश गाठलं.
बापाने गुन्ह्याची कबुली दिली
पोलिसांनी 2 दिवस आरोपी बापूराव कळमेकर आणि मुलगा अजय कळमेकर यांच्यावर पाळत ठेवली. त्यानंतर विश्वासात घेऊन चौकशी केली असता बापूराव याने गुन्ह्याची कबुली दिली. वडिलाने दिलेल्या माहितीनुसार, शिवानीचे त्याच्या मोठ्या जावयासोबत अनैतिक संबंध होते. ते प्रकरण निपटारा होत नाही तोच तिचे चुलत भावासोबत सूत जुळलं. एवढं सगळं झाल्यानंतर समाजात बदनामी नको म्हणून तिचे विदर्भातील अमरावती जिल्ह्यात धारणी येथे लग्न लाऊन दिले.
माहेरी आली अन् नको त्या अवस्थेत…
लग्नानंतर शिवानी माहेरी आली होती. नवरा तिला न्यायला आला असतानाच सर्व पाहुणे घराबाहेर झोपले होते. तेव्हा शिवानीने पुन्हा तिचा चुलत भाऊ अरुणला घरात बोलावलं. नको त्या अवस्थेत असतानाच वडिलांनी पाहिलं. त्यानंतर रागाच्या भरात लोखंडी रॉडने शिवानीवर वार करून तिला ठार केलं, असा कबुली जबाबच आरोपी बापाने दिला.
मृतदेहाची अशी लावली विल्हेवाट
खुनाच्या दुसऱ्या दिवशी शिवानीचे प्रेत एका पोत्यात टाकून बुलढाणा जिल्ह्यातील जळगावच्या राजूर येथील जंगलात टाकले. ओळख पटू नये म्हणून तिथे तिचे शीर धडावेगळे केले, डोक्यावरचे केस कापले, कान, नाक कापून हातावर गोंदलेले अरुण नाव देखील कोयत्याने मिटवले आणि पेट्रोल टाकून प्रेत पेटवून दिले. अर्धवट जळालेल्या अवस्थेत शिवानीचा मृतदेह घेऊन पोलिसांनी तपास चक्रे फिरवत शिवानीचा खून करणाऱ्या बापाला आणि मदत करणाऱ्या भावाला मध्यप्रदेश मधून अटक केली आहे.
डबल मर्डर मिस्ट्री असण्याची शक्यता
हत्येच्या वेळी घटनास्थळावर हजर असलेला अरुण अद्याप पोलिसांना सापडला नाही. त्यामुळे या प्रकरणाला डबल मर्डर मिस्ट्रीची किनार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे अरुणचा शोध देखील बुलढाणा पोलिस घेताना दिसत आहेत. या प्रकरणातील खरी कहाणी अरुण हाती लागल्यानंतर स्पष्ट होणारच आहे. मात्र अरुणचाच पत्ता लागत नसल्याने अरुण सोबतही शिवानी प्रमाणे काही अनुचित तर घडलं नाही ना? असा प्रश्न निर्माण होतोय.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close