हटके

मुलीच्या रिल्स मध्ये आढळले दोन दहशतवादी 

Spread the love

कभी कभी दाग भी अच्छे होते है चा आला प्रत्यय 

पुणे  / नवप्रहार ब्युरो

                वर्तमान काळात रिल्स,सेल्फी आणि व्हिडिओ घेण्याच्या मोह लहान बालकांपासून तर वयोवृद्ध व्यक्तींना असतो. असे करतांना कधीकधी ज्या दुर्घटना घडतात तेव्हा त्यावर आक्षेप घेतल्या जाते. पण ‘ कभी कभी दाग भी अच्छे होते है ‘ या जाहिराती प्रमाणे एका सहा वर्षाच्या मुलीच्या रील्स मधून प्रत्यय आला आहे.

पहलगाम येथील बैसरन व्हॅलीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, ज्यात भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांचाही समावेश होता.

याचदरम्यान, आता पु्ण्यातील मावळच्या देहूरोड मधून रमेशचंद्र यांचे कुटुंब काश्मीरच्या पहेलगाव मध्ये सहलीसाठी गेलं होतं. तिथे आपल्या मुलीचा व्हिडिओ काढत असताना दोन दहशतवादी त्या व्हिडिओत कैद झालेले आहेत. त्यानंतर त्यांची सहल आटोपल्यानंतर ते घरी आले. नंतर दोन दिवसांनी हल्ला झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की, व्हिडिओत दिसणारे हेच ते आतंकवादी आहेत, जे रेकी करत होते.

‘साम टिव्ही’चे प्रतिनिधी दिलीप कांबळे यांनी रमेशचंद्र यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी थरारक अनुभव सांगितला. ते म्हणाले की, ‘१८ एप्रिल २०२५ला आम्ही पहलगाममध्ये सहलीला गेलो होतो. पहलगामहून साडेसात किलोमीटवर बेताब व्हॅली म्हणून आहे, आणि आम्ही तिथे फिरायला गेलो होतो. तिथे आम्ही आमच्या सहा वर्षीय मुलीचा रिल्स बनवत होतो. आम्ही बनवलेल्या रिलमध्ये ते दोन माणसं कैद झाले होते. आम्ही श्रीनगरमध्ये होतो तेव्हा आम्हाला माहिती झालं की, २२ तारखेला तिथे गोळीबार झाला. श्रीनगरहून आम्ही जम्मूला आलो आणि तिथून आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर सिक्युरिटी फोर्सेसने चार दहशतवाद्यांचा फोटो जारी केला’.

रमेशचंद्र पुढे म्हणाले की, ‘त्या चार दहशतवाद्यांचा फोटो पाहिल्यानंतर आम्ही हैराण झालो. त्यामधील दोन जणांचे फोटो आम्हाला ओळखीचे लागले. मी आणि माझ्या बायकोने रात्रभर पहलगाममध्ये काढलेले फोटो आणि व्हिडिओ शोधले, आणि माझ्या मुलीच्या व्हिडिओमध्ये हे दोन दहशतवादी चालताना दिसले. हे दोघं आम्हाला या कारणामुळे संशयित वाटले की, माझ्या मुलीने साधा ड्रेस घातला असून त्या दोघांनी हिवाळ्यातील गरमी देणारे काश्मीरी कपडे घातलेले होते.’ असा अंगावर शहारा आणणारा अनुभव सांगितला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close