क्राइम

मुलगी प्रियकरासोबत पळाली , बापाने यमसदनी धाडली 

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार ब्युरो

                     मुलगी प्रियकरा सोबत पळून गेल्याने बाप इतका चवताळला की त्याने मुलीची हत्या करून मृतदेह बंद बाथरूम मध्ये लपवून ठेवला होता. मुलगी दिसत नसल्याने आईने बापाला याबद्दल विचारणा केली असता त्याने ती पुन्हा पळून गेल्याचे सांगितले. पण आईला शंका आल्याने तिने मुलीच्या मामांना हा प्रकार सांगितला. मामाने पोलिसात तक्रार दाखल केल्यावर हा प्रकार उघड झाला.

पीडित मुलीचं नाव साक्षी असून ती 25 वर्षांची आहे. 7 एप्रिलला तिची हत्या करण्यात आली. घरातील बंद करण्यात आलेल्या बाथरुममध्ये तिचा मृतदेह आढळला.

आरोपी मुकेश सिंग मुलीच्या प्रियकराला मारण्यासाठी त्याच्या मागे गेला होता, परंतु तो गावात नव्हता. साक्षीचा मामा विपीन कुमार यांनी सांगितलं आहे की, ती 4 मार्च रोजी तिच्या प्रियकरासह दिल्लीला पळून गेली होती, जो दुसऱ्या जातीचा होता आणि तिच्या घराजवळ राहत होता. दोघंही एकत्र कॉलेजला जात होते, असं विपीन कुमार यांनी सांगितलं.

आरोपी मुकेश सिंग माजी सैनिक असल्याचं सांगितलं जात आहे. एक आठवड्यापूर्वी त्याने मुलीला राजधानी दिल्लीतून समस्तीपूरला परत येण्यासाठी तयार केलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी ती गायब झाली.

मुलीच्या आईने मुकेश सिंगला मुलीबाबच विचारणा केली. त्यावर त्याने ती पुन्हा घराबाहेर पडली असल्याचं सांगितलं. तथापि, नंतर तिला संशय आला आणि तिने पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यांच्या निवासस्थानी असलेल्या बंद बाथरूममधून दुर्गंधी येत असल्याचं लक्षात आले. त्यानंतर त्यांना तिचा मृतदेह आढळला. पोलिसांनी सिंगची चौकशी केली तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close