क्राइम

अन कोर्टाचा निकाल ऐकून लेकीला झाले अश्रू अनावर

Spread the love

तुमसर येथील सोनी हत्याकांड प्रकरण.

भंडारा / विशेष प्रतिनिधी

               जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल।ऐकून लेकीला अश्रू अनावर झाले. सोनी हत्याकांडातील 7 आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. निकाल लागताच लेकीला अश्रू अनावर झाले. 9 वर्षानंतर मिळालेल्या न्यायावर मुलीने समाधान व्यक्त केले आहे.

          26 फेब्रुवारी 2014 रोजी तुमसर येथील सोने चांदीचे व हिऱ्याचे व्यापारी संजय सोनी यांच्या घरावर दरोडेखोरांनी दरोडा टाकून जवळपास 5 कोटींच्या दागिने घेऊन आरोपी पसार झाले होते. दरोड्या दरम्यान त्यांनी संजय सोनी पत्नी पूनम आणि 12 वर्षीय मुलगा धुमील याची निर्घृण हत्या केली होती. प्रकरण प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी.अस्मर यांच्या कोर्टात या प्रकरणाची सूनवाई सुरू होती. विश्वासू चालकानेच सोनी कुटुंबाचा घात केल्याचं सिद्ध झालं. या प्रकरणी 275 पानांचं निकालपत्र तयार करण्यात आलं. तर 800 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात सादर केलं होतं आणि पाच वर्ष हा खटला चालला

26 फेब्रुवारी 2024 ला संजय सोनी हे त्यांच्या चालकासह वाहनाने गोंदिया येथे सोने आणि चांदी खरेदी आणि विक्रीसाठी गेले होते. तिथून परत येत असताना गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बिरसी फाट्यावर चालकाने संजय सोनी यांचा नायलॉनच्या दोरीनं गळा आवळून हत्या केली. त्यानंतर वाहनामध्ये मृतदेह टाकून चालक घरी पोहोचला. त्यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास चालकाने सोनी यांची पत्नी पूनम आणि मुलगा धृमील यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करून दागिने पळविले होते. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी फिर्यादीची बाजू मांडली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close