ऑरेंज सिटी वॉटर लिमिटेड ला दिलेले कंत्राट रद्द करा – मनसे
नागपूर / अमित वानखडे
ऑरेंज सिटी वॉटर लिमिटेड (OCWL) कंपनी ला दिलेले तसेच नागपूर शहरासाठी शाप ठरलेले २४x७ पाणी पुरवठा योजनेचे कंत्राट तात्काळ रद्द करा.अशी मागणी .महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपुर शहरा कडुन पत्रकार परिषद घेऊन करण्यात ली आहे.
मोठा गाजावाजा करत नागपूरच्या जनतेला २४ x ७ पाणी देण्याचे आमिष दाखवून बनविण्यात आलेली पाणीपुरवठा योजना ही पूर्णपणे फसलेली असून आजही नागपूर शहरातील जवळपास ७५% भाग हा पाण्यासाठी व्याकूळ आहे ही वस्तुस्थिती आहे. राजकीय आश्रय असलेल्या टँकर लॉबीचा महानगर पालिकेवर दबाव असून बऱ्याचश्या भागात आजही टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नागपूर शहराला २४ तास पाणी मिळावे यासाठी सदर योजनेचा सखोल अभ्यास केला असता त्यामागचे वास्तव उघड झाले. माहिती अधिकारात प्राप्त कागदांच्या आधारे नागपूरकरांवर थोपविण्यात आलेली पाणीपुरवठा योजना ही निव्वळ फसवी असून २४ x ७ पाणी देण्याचे हे त्यावेळच्या सत्ताधारी पक्षाने दिलेले निव्वळ आश्वासन असल्याचे उघड झाले आहे.
मनसे नी सहाय्यक आयुक्तांपासून अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्या भेटी घेवून सविस्तर चर्चा केली परंतु, ते पूर्णपणे हतबल असल्याचे दिसले. राजाश्रय असलेली OCWL Company ही मनपा च्या कोणत्याच अधिकान्याला दाद देत नसून त्यांची मनमानी सुरू असताना महानगर पालिका OCWL वर का कारवाई करत नाही हाच खरा प्रश्न आहे. २५ वर्षांच्या मुदती मधील १५ वर्षे होऊन गेली तरी ७५% नागपूर जनता पाण्यासाठी व्याकूळ असेल तर अश्या कंपनीला किती आणि का संधी द्यायची हा प्रश्न उपस्थित होतो. मनपा आयुक्तांना भेटीची वेळ मागितली असता ३ महिने भेट टाळणारे आयुक्त राजकीय दबावातून कंपनी ला वाचवत असतील तर मनसेला आंदोलनाशीवाय पर्याय उपलब्ध रहात नाही आणि याच कारणास्तव २ जून रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
महत्प्रयासाने आयुक्तांच्या भेटीची वेळ चर्चे दरम्यान सर्व मुद्दे उपस्थित करून नागपूर शहराला एकसारखा २४ x ७ पाणीपुरवठा कधी मिळणार ह्या प्रश्नाचे उत्तर न देता OCWL Company ची वकीलीच करताना आयुक्त व अधिक्षक अभियंता दिसले. मनसे च्या प्रश्नांची उत्तर नसलेले अथवा सोईस्कर उत्तर टाळणाऱ्या आयुक्तांनी केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी यांनी घेतलेल्या बैठकीत OCWL Company योजना’ चालविण्यास असमर्थ असल्याचे तसेच ही योजना महानगर पालिकेकडे आल्यास उत्तम प्रकारे चालविली जाईल असे आश्वासन दिले. हाच प्रश्न मनसे नी चर्चे दरम्यान उपस्थित केला असता टाळाटाळीची उत्तरे दिली गेली.
OCWL Company योजना यशस्वी करण्यात अपयशी असल्याचे केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी व सर्व उपस्थितांसमोर आयुक्तांनी मान्य केल्यामुळे OCWL ला कंत्राट तात्काळ रद्द करून कंपनी ला काळ्या यादीत टाकण्याची मागणी मनसे द्वारे करण्यात येत आहे.
याबाबत मनसे कायदेशीर सल्ला घेत असून जनहित याचिका दाखल करण्याचा विचार करीत आहे.
नागपूरकरांच्या पाणीप्रश्नावर मनसे तर्फे २ जुन ला निघणाऱ मोर्चा , शहराच्या पाणीप्रश्नाला शाशन दरबारी वाचा फोडण्यास हा प्रयत्न आहे.