क्राइम

तरुणीला भर रस्त्यात तलवारीने छाटले

Spread the love
मोहाली (पंजाब )/ नवप्रहार डेस्क
            देशात काही अश्या घटना घडतात की गुन्हेगार लोकांना कायद्याची काहीच भीती वाटत नसल्याचे पाहायला मिळते. पंजाब च्या मोहाली शहरात कायद्याची लत्करे वेशीवर टांगणारी घटना घडली आहे. येथे एका तरुणाने आपल्या मैत्रिणीसोबत कामावर जात असलेल्या तरुणीवर तलवारीने हल्ला करून तिचा खून केला आहे. बलजिंदर कौर असे त्या मृत तरुणींचे नाव आहे.
                  उपलब्ध माहिती नुसार बलजिंदर कौर ही तरुणी मूळची फतेहगढ साहिब च्या फतेहपुर जट्टां गांव येथील रहिवासी होती.आणि मागील 9 वर्षांपासून मोहाली येथील फेज 5 मधील एका कॉल सेंटरधे नोकरी करत होती. घटनेच्या दिवशी ती आपल्या दोन मैत्रिणीसह कामावर जात असतांना गुरुद्वारा समोर अचानक तोंडाला कापड बांधून आलेल्या युवकाने तिच्यावर तलवारीने वार करणे सुरू केले. ही घटना जवळच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
                    पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार हमलावर तरुण आणि मृतका एकमेकांना ओळखत होते आणि आरोपी हा तेथिलच एका पेट्रोल पंप वर काम।करत होता. सुखचैन सिंह असे त्याचे नाव असून तो समराला येथील निवासी आहे. या प्रकरणाची राज्य महिला आयोग ने दखल घेतली आहे. मृतकाच्या भावाने सांगितल्या प्रमाणे त्यांना कंपनीच्या मॅनेजर कडून घटनेबद्दल कळले.  बलजिंदर ने कधीच या तरुणाबद्दल कुटुंबियांना माहिती दिली नव्हती.  तर पोलिसांचे म्हणणे आहे की तरुणी आणि आरोपी दोघांना ओळखत होते. घटनेच्या काही तासातच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close