सामाजिक

मुरलीत प्रहार पक्षाच्या शाखेचे अणावरण

Spread the love

 

प्रहारची घाटंजी तालुक्यात गांव तेथे शाखा सुरु

घटंजी ता. प्रतिनिधि-
दि. ६/३/२४ रोज बुधवार ला वंदनीय बच्चु भाऊ कडू यांच्या विचारांचा वारसा घेऊन प्रहार जनशक्ती पक्ष घाटंजी तालुक्यात गाव तिथे शाखा या अभियाना अंतर्गत संपूर्ण तालुक्यातील शाखेचे अनावरण करणे सुरु असून प्रत्येक गाव पातळीवर संपूर्ण शेतकरी,कष्टकरी,वंचित, उपेक्षित, कामगार,अपंग, अन्यायग्रस्त,अनाथाच्या सेवेचा वारसा घेऊन प्रहारच्या माध्यमातून शाखा उभारली जात असून तालुक्यातील मुरली येथे ३ -या शाखेचे अणावारण करण्यात आले. या प्रसंगि उपस्थितास प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका अध्यक्ष सुरज हेमके, घाटंजी शहरप्रमुख सचिन कर्णेवार यांची उपस्थाती होती. या कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेस माल्यार्पण व दिपप्रज्वलन करुन करण्यात आली. याप्रसंगी मुरली शाखा प्रमुख म्हणून महेश भेदूरकार यांची नियुक्ती करण्यात आली तर तालुका सचिव पदी आशिष भोयर पाटील यांची नियुक्ति करण्यात आली. मुरलीतील युवाकांचा यात प्रचंड असा उत्साह दिसून आला.
०००००००००००००००००००

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close