क्राइम
१७ वर्षे लैंगिक अत्याचार, बाबावर असलेल्या विश्वासापायी घरचे मानायला तयार नाही


पुणे / विशेष प्रतिनिधीं
श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा असू नये असे नेहमीच पटवून सांगितल्या जाते. पण ईश्वरीय शक्तीने अगदी सहज सगळे साध्य करता येईल या लालसेपाई अनेक लोकं भोंदू बाबाच्या जाळ्यात फसतात.आणि आपले आयुष्य उध्वस्त करून बसतात. अशीच एक घटना उजेडात आली आहे. महिलेने कुटुंबियांना तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराबाबत सांगण्याच्या प्रयत्न केला.पण कुटुंबाचा बाबा वर असा काही विश्वास होता की ते तिचे मानायला तयार नव्हते. शेवटी तिने सर्व पुरावे गोळा करत बाबाच्या कृत्याचा पर्दाफाश केला.
स्वतःला देव आणि ईश्वराचा
अवतार असल्याचे भासवून एका उच्चशिक्षित कॉर्पोरेट महिलेसोबत एका बाबाने धक्कादायक कांड केलं. त्याने महिलेवर तब्बल १७ वर्षे सतत लैंगिक अत्याचार, मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. पुण्यातील खराडी येथील उबाळेनगर परिसरात आश्रम आणि गुरुकुलाच्या नावाखाली हा अघोरी प्रकार सुरू होता. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मध्यरात्री धडक छापा टाकत मुख्य कथित ढोंगी बाबा राधामोहन मिश्रा (वय ५९) याच्यासह तब्बल आठ जणांना अटक केली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
आश्रम आणि गुरुकुलाच्या नावाखाली गैरप्रकारांचा पर्दाफाश
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला उच्चशिक्षित असून ती पुण्यातील एका नामांकित खाजगी कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करते. तिचे कुटुंब मूळचे हरियाणातील असून तिचे आई-वडील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. सुमारे २५ वर्षांपूर्वी या कुटुंबाची ओळख स्वामी केवल नयन यांच्या माध्यमातून कथित बाबा राधामोहन मिश्रा याच्याशी झाली होती. या ओळखीनंतर संपूर्ण होती. या ओळखीनंतर संपूर्ण सुशिक्षित कुटुंब अंधश्रद्धेपायी या ढोंगी बाबाच्या पूर्णपणे प्रभावाखाली गेले.
१७ वष अत्याचार; पालकानाहा केला नाही विश्वास
सन २०१० मध्ये हे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. त्यानंतर पीडित महिला या आश्रमाच्या नियमित संपर्कात राहिली. याचाच गैरफायदा घेत आरोपी राधामोहन मिश्रा याने तिच्यावर मानसिक, शारीरिक आणि लैंगिक अत्याचार सुरू केले. स्वतः देव असल्याचा बनाव करत त्याने तब्बल १७ वर्षे तिचे अमानुष लैंगिक शोषण केले. पीडितेने अनेकदा धाडस करून आपल्या पालकांना या अत्याचाराची माहिती दिली, मात्र अंधश्रद्धेत बुडालेल्या पालकांनी अत्याचाराची माहिती दिली, मात्र अंधश्रद्धेत बुडालेल्या पालकांनी स्वतःच्या मुलीऐवजी त्या ढोंगी बाबावर विश्वास ठेवला. अखेर हार न मानता, पीडितेने अत्यंत हुशारीने या ढोंगी बाबाविरूद्ध भक्कम पुरावे गोळा केले. हे पुरावे पाहिल्यानंतर कुटुंबीयांचे डोळे उघडले आणि त्यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्रीनंतर
खराडीतील आश्रमावर छापा टाकून
मुख्य आरोपी मिश्रासह ८ जणांना
बेड्या ठोकल्या. त्यांच्यावर बलात्कार, कट रचणे, शारीरिक- मानसिक छळ, तसेच ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कोर्टात हजर केले असता, न्यायालयाने सर्व आरोपींना
२० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.




