क्राइम

पोलिस स्टेशन अलीपुर येथील एल सी बी पथ कांची मोठी कार्यवाही

Spread the love

देवळी प्रतिनिधी / सागर झोरे

कट रचुन रस्त्यात अडवुन जबरी चोरी व अपहरण करून खंडणी वसुल करणाऱ्या अज्ञात आरोपींचा शोध घेवुन त्यांना
६ तासात अटक केली.
यातील फिर्यादी नामे तेवला लक्ष्मीनारायण रेड्डी, वय ४२ वर्ष, रा. कुलुकुलुरु जि. ईस्ट गोदावरी (आंध्रप्रदेश)
ह. मु. मातोश्री सभागृह मागे आर्वी रोड, वर्धा हा धनलक्ष्मी फायनान्स कम्पनीत काम करतो. दि. ०१/०३/२०२३
रोजी नेहमी प्रमाणे वर्धा येथुन २५,०००/- रू नगदी रोख घेवून त्याचे मोटर सायकलने सातेफळ, कुंभी, हिंगणघाट येथे
पैसे वाटप व वसुलीने कामा करीता गेला. रात्री अंदाजे १०:३० वाजताचे सुमारास हिंगणघाट येथुन वसुलीचे काम
आटपुन ४८,०००/-रू नगदी रोख घेवुन मोटर सायकलने वर्धा येथे धोत्रा मार्गे परत येत असतांना धोत्रा चौरस्त्याचे
समोर एका स्विफ्ट डिझायर कार गधिल अज्ञात चार ईसमांनी त्यास रस्त्यात अडवुन त्याचे कडे असलेले नगदी
४८,०००/-रू जबरीने हिसकावून घेतले व त्याला त्या चार अज्ञात इसमांनी त्यांचे कारमध्ये यसवुन त्याचे अपहरण
करून त्याला रात्री इकडे तिकडे फिरवत राहीले. नंतर अंदाजे रात्रीचे ०२:०० वाजता दरम्यान वर्धा येथील त्याचे
साथीदारांना फोनवर धमकावुन “तुम्हारा साथी हमारे कब्जेमे है, दस लाख रूपये दो और उसको लेके जाव नहीं तो
उसके हात पैर बांधकर पुलीयापेसे फेक देंगे” अशी धमकी दिली. फिर्यादी यांचे वर्धा येथील नातेवाईक व मित्रांनी रात्री
२,००,०००/- रूपयांची जुळवाजुळव करून अपहरण कर्त्यांना फोन केला. तेव्हा सदर रक्कम घेण्याकरीता फिर्यादीचे
मोटर सायकलने यातील दोघे आरोपी आर्वी नाका, वर्धा येथे येवून २,००,०००/- रू घेवुन गेले व फिर्यादीस इंझापुर
येथे सोडून दिले. काही दिवसानंतर फिर्यादीचे मोबाईलवर त्याच ईसमानी फोन करून “अपने परिवारकी सलामती चाहता
है तो ५०,०००/- रुपये फोन पे पर भेज” असे धमकावीले फिर्यादीने स्वतःचा फोन बंद केला असता काही दिवसांनी
परत फिर्यादीचे पुतण्याला अश्याच प्रकारे धमकावीण्यात आले. तेव्हा फिर्यादीने आरोपीनी सांगीतल्याप्रमाणे फोन पे ने
रूपये आरोपोंचे दिलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठविले. फिर्यादी हा आंध्रप्रदेश राज्यातील असल्याने व
त्यास मराठी भाषा अवगत नसल्याने मराठी व तेलगु भाषा समजणान्या नातेवाईकास वर्धा येथे बोलावुन मा. पोलीस
अधिक्षक साहेब वर्धा यांची भेट घेवून घडलेला प्रकार सांगीतला. मा. पोलीस अधिक्षक सा. यांनी घटनेचे गांभीर्य
ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना सदर घटने संबंधाने कारवाईचे आदेश दिले व
नमुद फिर्यादी यांना पोलीस स्टेशन अल्लीपुर येथे जावुन तकार देण्यास सांगीतले फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पो.
स्टे अल्लीपर येथे अप क. ११६/२०२३ कलम ३९२, ३६४ (अ). ३८६, १७०, ३२३, ३४ भा. दं. वि. अन्वये
गुन्हा नोंद करण्यात आला. फिर्यादीचे तकारीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने अदिलाबाद (तेलंगाणा) येथे
जावुन घटना घडल्याची माहीती प्राप्त झाल्यापासून सहा तासाचे आत आरोपी नामे ०१) शेख मुखीद अहमद युसुफ,
वय ३१ वर्ष ०२) संजय देवन्ना ओसावार वय ३४ वर्ष ०३) सुर्यकांत राम मटपती वय ३० वर्ष ०४) शाहरूख
पठाण अजिज पठाण, वय २८ वर्ष ०५) नंदकुमार रामचंद्र शेटे, वय २८ वर्ष ०६) विठ्ठल पांडुरग काबळे, वय २८
वर्ष, सर्व राहणार रणदिवे नगर अदिलाबाद (तेलंगाणा) यांना शोधुन शिताफीने ताब्यात घेवून त्यांची सखोल चौकशी
केली असता त्यांनी संगणमताने सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीना ताब्यात घेवून त्याचेकडुन गुन्हयातील
हिसकावलेलो नगदी रक्कम १,३१,९००/-रूसह गुन्हयात वापरलेली कार व आरोपींचे सहा मोबाईल असा एकूण
चा मुद्देमाल जप्त करून आरोपीताना ताब्यात घेवून त्यांना अटक करून पुढील कारवाई करीता
अल्लीपुर पोलीसाचे ताब्यात देण्यात आले. तसेच सदर गुन्हयात कलम ३४१, १२० (ब) भा.दं.वि अन्वये वाढ करण्यात
आली आहे. अटक आरोपी यांची पोलीस कोठडी घेतुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास सुरू आहे.
1.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक नूरुल हसन सा वर्धा, अप्पर पोलीस अधिक्षक मा. डॉ. सागर कवड़े
सा. वर्धा उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगांव श्री. गोकुळसिंग पाटील सा. स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा श्री. संजय
गायकवाड, पोलीस निरीक्षक श्री. सुनिल गाई पो स्टे अल्लीपुर यांचे मार्गदर्शनात पो. उप.नि. अमोल लगड, पोलीस
असून सदर गुन्हा दाखल केला

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Sumit Baniya

Related Articles

Back to top button
Close
Close