विदेश

काय झाले असे की….नवजात बाळाला पाहतच नर्स जोराने किंचाळली

Spread the love

डॉक्टर च्या तोंडून देखील ओह गॉड असे निघाले 

वॉशिंग्टन / नवप्रहार डेस्क 

              नवीन पाहुण्याच्या आगमनाची प्रतीक्षा कुटुंबातील सगळ्यांना असते. सगळ्यात जास्त हुरहुरी असते ती आईला. कारण पोटात बाळाचे भ्रूण आहे हे समजल्या पासून ती बाळाची विशिष्ट काळजी घेत असते . 9 महिने प्रतीक्षा केल्यानंतर जेव्हा प्रसूतीची वेळ येते तेव्हा आईसह संपूर्ण कुटुंबाला बाळाला पाहण्याची घाई झालेली असते. धाकधूक वाढलेली असते. बाळ कसं असेल हे पाहण्याची उत्सुकता असते.

असंच एक कुटुंब बाळाची प्रतीक्षा करत होतं. जेव्हा या बाळाचा जन्म झाला तेव्हा त्याला पाहून नर्स किंचाळली, डॉक्टरही शॉक झाले.

अमेरिकेतील अलाबामामधील हे प्रकरण. पामेला मान नावाची महिला. बर्मिंगहॅममध्ये राहते आणि डिलिव्हरी ड्रायव्हर म्हणून काम करते.अलाबामा ग्रँड व्ह्यू मेडिकल सेंटरमध्ये ती डिलीव्हरीसाठी आली. तिची सिझेरियन डिलिव्हरी झाली. तिला मुलगी झाली. पण मुलीला पाहताच नर्स, डॉक्टर सगळे आश्चर्यचकीत झाले.

पामेला म्हणाली, ‘डॉक्टरांनी जेव्हा माझी डिलीव्हरी केली आणि बाळ जन्माला आलं तेव्हा सर्व नर्स उत्स्फूर्तपणे ओह गॉड अशा ओरडल्या. त्यांचे शब्द ऐकून मलाही धक्का बसला, कारण मला काय झालं ते समजत नव्हतं.

बाळात असं काय पाहिलं?

नर्स ओरडल्या कारण बाळ अपेक्षेपेक्षा मोठं होतं. जन्मावेळी बाळाचं वजन 13 पौंड 4 औंस होतं. किलोग्रॅममध्ये पाहिलं तर ते 6 किलोग्रॅमपेक्षा थोडं जास्त आहे. साधारणपणे जन्माच्या वेळी निरोगी बाळाचे सरासरी वजन 7 पौंड म्हणजेच 3.17 किलो असतं.

बाळाच्या जन्माच्या चार आठवड्यांपूर्वी, एका डॉक्टरने तिचं वजन 8 पौंड मोजलं, परंतु एका तंत्रज्ञाने सांगितलं की तिचं वजन 10 पौंड आहे. WVTM13 च्या वृत्तानुसार. पामेला म्हणते, ‘ते जे म्हणत होते त्यापेक्षा त्यात बरंच काही होतं हे दिसून आलं.

या मुलीचा जन्म प्रसूती तारखेच्या 16 दिवस आधी झाला. नवजात असूनही तिला 6 महिन्यांच्या बाळासाठी असलेले कपडे घातले जात आहेत.

रुग्णालयातील परिचारिका देखील वारंवार येऊन या धडधाकट मुलीकडे आश्चर्यचकित नजरेने पाहत आहेत. पामेला म्हणते, ‘ती फक्त तीन दिवसांची आहे आणि आधीच खूप प्रसिद्ध आहे.’

जगातील सगळ्यात लठ्ठ बाळ

पॅरिस वजनाने मोठी असली. तरी जगातील सर्वात लठ्ठ बाळापासून अजूनही ती खूप दूर आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, सर्वात वजनदार बाळाचा जन्म 1955 मध्ये इटलीमध्ये झाला होता, त्याचं वजन 22 पौंड म्हणजेच सुमारे 10 किलो होतं.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close