राज्य/देश

बिश्नोई गँग ने पाकिस्तानला दिली ही धमकी 

Spread the love

जम्मू काश्मीर मधील पहलगाम या बैसरन व्हॅली येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेचे देशभर पडसाद उमटले असून सामान्य जनता या घटनेची तीव्र शब्दात निंदा करत आहे. अश्यातच मागील काही काळापासून चर्चेत आलेल्या लॉरेन्स बिश्नोई गँग ने पाकिस्तान ला दिलेल्या धमकीची सगळीकडे जोरदार चर्चा आहे.

बिश्नोई टोळीच्या वतीने पाकिस्तानला सांगण्यात आले आहे की ते एका व्यक्तीला मारणार आहेत ज्याची बरोबरी लाखों लोकांसोबत होते. या धमकीसोबत दहशतवाद्याचा फोटोही जोडण्यात आला आहे. हा दहशतवादी कोण आहे आणि त्याने कोणते गुन्हे केले आहेत ते जाणून घेऊया.

काश्मीरमधील पहलगाममधील हल्ल्यानंतर, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये दहशतवादी हाफिज सईदचा फोटो लावण्यात आला आहे आणि त्यावर क्रॉस लावण्यात आला आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे की, “तुम्ही आमच्या निष्पाप लोकांना मारले आहे, आता आम्ही पाकिस्तानात घुसून एका माणसाला मारू ज्याची किंमत एक लाख लोकांएवढी असेल.”

हाफिज सईद कोण आहे?

हाफिज सईद हा भारतासाठी मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. हाफिज हा लष्कर-ए-तैयबा या मोठ्या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. हा दहशतवादी मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड देखील आहे. याशिवाय, भारतावरील बहुतेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये हाफिजचा हात आहे. या दहशतवाद्याने पुलवामामध्ये एकाच वेळी अनेक सैनिकांवर बॉम्बस्फोट करण्याचा कट रचला होता. भारताव्यतिरिक्त जगातील अनेक देशांनी हाफिजला दहशतवादी घोषित केले आहे. भारताने अनेक वेळा पाकिस्तानला या दहशतवाद्याला भारताच्या ताब्यात देण्याची विनंती केली आहे, परंतु पाकिस्तानने त्याला आश्रय दिला आहे.

लॉरेन्स बिश्नोई गॅंग कशी काम करते?

लॉरेन्स बिश्नोई गॅंग भारतातील अनेक राज्यांमध्ये सतत सक्रिय आहे. या टोळीचा म्होरक्या लॉरेन्स सध्या गुजरातमधील तुरुंगात आहे. पण, त्याचे साथीदार खून आणि खंडणी यासारख्या गोष्टी सतत करत आहेत. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारात आणि बाबा सिद्दीकीच्या हत्येत या गॅंगचे नाव पुढे आले. याशिवाय पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला याचीही बिश्नोई टोळीने हत्या केली होती. या हत्येनंतर ही गॅंग खूप चर्चेत आली. आता या भयानक गॅंगने पाकिस्तानला उघड धमकी दिली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close