क्राइम

सासऱ्याचा सुनेवर नवऱ्या समोर बलात्कार 

Spread the love

पिंपरी-चिंचवड 

 पिंपरी चिंचवड मधून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे.येथे एका सासऱ्याने नवऱ्या समोरच सुनेवर बलात्कार केला आहे. इतकेच नाही तर आरोपींनी महिलेला वेश्या व्यवसाय करण्यासही भाग पाडले. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहर हादरले. याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी येथे राहणाऱ्या महिलेवर तिच्या सासऱ्याने नवऱ्यासमोरच बलात्कार केल्याचे समोर आले आहे. एकदा नाही तर आरोपी वारंवार महिलेवर बलात्कार करत असल्याचे उघड झाले आहे. या घटनेतील नराधम नवरा आणि सासरा एवढेच करून थांबले नाही तर त्यांनी पीडित विवाहित महिलेची डेटिंग ॲपवर बनावट प्रोफाइल तयार करून तिला वेगवेगळ्या पुरुषांसोबत वेश्या व्यवसाय करण्यासही भाग पाडले.

महिलेने देहविक्रीचा व्यवसाय करण्यास नकार दिल्यानंतर तिला तिचा नवरा आणि सासर्‍याने अमानुषपणे मारहाण केली. विवाहित महिलेने या त्रासाला कंटाळून पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली, तर तिला तिच्या सासूने मुलांसोबत घराबाहेर काढले त्यामुळे महिला आता बेघर झाली आहे. या प्रकरणात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून भोसरी पोलिस ठाण्यामध्ये तिचा नवरा आणि सासऱ्याविरोधात बलात्काराचा आणि बळजबरी देहविक्रीचा व्यवसाय करवून घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘माझ्यावर झालेल्या अन्याय विरोधात मला शासनाने तात्काळ न्याय मिळवून देऊन दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी.’, अशी मागणी पीडित महिलेने केली आहे. सध्या ही महिला न्याय मिळावा यासाठी भीक मागत आहे. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. भोसरी पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close