क्राइम

पालकांकडे तक्रार केल्याचा खुर्रा…. विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिकेला संपवले

Spread the love
बाबू या शब्दाने झाला हत्याकांडाचा उलगडा

कोलमडेपल्ली (तेलंगणा) / विशेष प्रतिनिधी
               पूर्वी शिक्षक मुलांना छडी ने मारायचे त्यावेळी ‘ छडी लागे चमचम विद्या येई घमघम ‘ असे म्हटले जायचे. हल्ली मुलांना साधे धाकदपट जरी केली तरी मुलांचे पालक सरळ तक्रार घेऊन शाळेत पोहचतात. शिक्षक मुलांना योग्य वळण लागावे यासाठी धाकदपट करतात. कधी कधी सौम्य शिक्षा देखील करतात. कोलमडेपल्ली येथील एका शिक्षिकेला मुलांच्या गैरवर्तनाबद्दल तक्रार केल्यावर मुलांनी शिक्षिका (मुख्याध्यापिकेला ) समापविल्याचा प्रकार घडला आहे.
                घटना तेलंगणा राज्यातील कोलमडेपल्ली आहे. कल्लू रूपा रेड्डी या येथील नागार्जुन पब्लिक स्कूल मध्ये मुख्याध्यापिका होत्या. शाळेतील दोन मुलांच्या स्कूल बॅग मध्ये मोठी रक्कम सापडल्याने त्यांनी सबंधित मुलांच्या पालकांकडे याबद्दल तक्रार केली होती. पालक मुलांवर रागावले होते. त्यामुळे रेड्डी मॅडम यांना घेऊन मुलांच्या मनात राग खदखदत होता.
                   हे दोन्ही विद्यार्थी चोरीच्या उद्देशाने रूपा रेड्डी यांच्या घरात शिरले. घरातील दीड लाख रुपयांवर हात साफ केला. दरम्यान रूपा यांनी त्यांना चोरी करताना पकडले. त्यामुळे मुलांनी सोबत असलेल्या चाकूने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यात त्या गतप्राण झाल्या.
मोबाईल रेकॉर्डिंग मधील बाबू शब्दाने केला उलगडा – रूपा रेड्डी यांच्या हत्येनंतर पोलिसांचा तपास सुरू होता. पोलिसांनी रूपा यांचा मोबाईल तपासला त्यात शेवटच्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये बाबू हा शब्द होता. आणि येथूनच पोलिसांना तपासाचा धागा मिळाला. त्यांनी शाळेत जाऊन मॅडम बाबू कोणाला संबोधित होत्या याचा शोध घेतला.त्या विद्यार्थ्यांना वेगळे केले. यावेळी पोलिसांना समजले की यातील एक विद्यार्थी मागील काही दिवसात खूप पैशे उधळत होता. पोलिसांनी त्याला चौकशी साठी ताब्यात घेतले असता त्याने घटनाक्रम कथन केला.
 चोरीच्या पैशाने गोवा सहल – रूपा रेड्डी यांच्या हत्येनंतर त्यांच्या घरातून चोरलेले दीड लाख रुपयांच्या भरवश्यावर हे दोघे गोवा फिरायला गेले. तेथे त्यांनी भरपूर पैसा उधळला.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close