हिंदू आणि मुस्लिम मित्राची हत्या करून मृतदेह धुनीच्या खाली पुरले


मृतदेह पुरून त्यावर टाईल्स बसवल्या
मंदिराच्या पुजाऱ्यावर हत्येचा संशय , पुजारी फरार
लहचौडा / विशेष प्रतिनिधी
अंकित आणि इसरार असे दोन हिंदुमुस्लीम मित्र. दोघेही सिंगोली तगा येथील रहिवासी. त्यांची ओळख त्यांच्याच गावात राहणाऱ्या आणि गणपती मंदिरात सेवा देणाऱ्या पुजाऱ्या सोबत होती. सहा महिन्यांपूर्वी तो त्यांच्याच गावात राहत असल्याने त्यांच्यात ओळखी होती.20 दिवसांपूर्वी दोघे त्याला भेटायला आले होतें. आणि तेव्हा पासून बेपत्ता होते.
अंकित हा हिंदू होता तर इसरार मुस्लिम. दोघांचीही हत्या करून मृतदेह मंदिराच्या परिसरात पुरले गेले आणि त्यावर इंटरलॉकिंग टाईल्स लावल्या गेल्या, ज्यामुळे खाली मृतदेह आहेत याचा संशय कुणालाही येणार नाही.
अंकित-इसरार 20 दिवसांपासून गायब
अंकित आणि इसरार जवळपास 20 दिवसांपूर्वी घरातून निघाले, पण त्यानंतर परत आले नाहीत, त्यामुळे कुटुंब दोघांचा शोध घेत होतं. हे दोघं लहचौडा गावातील गणपती मंदिरात पुजाऱ्याला भेटायला गेले, त्यानंतर बेपत्ता झाल्याचं नातेवाईकांनी सांगितलं. यानंतर नातेवाईक मंदिर परिसरात अंकित आणि इसरारचा शोध घ्यायला लागले, तेव्हा त्यांना दोघांचे मृतदेह मंदिरातच पुरल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली. यानंतर पोलिसांनी खड्डा खोदला आणि त्यांना दोन मृतदेह मिळाले. अंकित आणि इसरार यांचे मृतदेह पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.
धुनीखाली पुरले मृतदेह
मंदिरातल्या धुनी खाली खड्डा खोदून दोघांचे मृतदेह पुरले गेले होते, यानंतर त्याच्यावर इंटरलॉकिंग टाईल्स लावल्या गेल्या. 20 दिवसानंतर अंकित आणि इसरारचा मृतदेह मंदिरात सापडल्यामुळे खळबळ माजली आहे. कुटुंबाने मंदिराच्या पुजाऱ्यावर हत्येचा आरोप केला आहे. अंकित आणि इसरारची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. मंदिराच्या पुजाऱ्यानेच हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. बागपतमधल्या चांदीनगर भागातील लहचौडा गावातील गणपती मंदिरात ही घटना घडली आहे.
पुजारी अंकित आणि इसरारचं गाव सिंगोली तगा येथील मंदिरात राहत होता. सहा महिन्यांपूर्वी तो लहचौडा गावातील गणपती मंदिरात आला. दोन्ही मित्र पुजाऱ्याला भेटण्यासाठी मंदिरात पोहोचले यानंतर ते संशयास्पद परिस्थितीमध्ये गायब झाले, असं कुटुंबाने सांगितलं आहे.
अंकित आणि इसरार यांची हत्या का केली गेली? या हत्याकांडामध्ये कोण कोण सामील आहे? याचा शोध पोलीस घेत आहेत. ज्या पुजाऱ्यावर कुटुंबाने संशय घेतला आहे, तो सध्या फरार झाल्याचं सांगण्यात येत आहे. कुटुंबाने पुजाऱ्याच्या एन्काऊंटरची मागणी केली आहे. तर दोघांची हत्या अनैतिक संबंधातून केली गेल्याचा संशय पोलिसांना आहे. मृत्यू झालेल्याचे कुटुंबातील महिलेसोबत अनैतिक संबंध होते, त्यामुळे ही हत्या झाल्याचं पोलीस म्हणाले आहेत




