गुरांच्या बाजाराला लावली शिस्त, त्याकरिता सभापती सुनील गावंडे गुरांचे बाजारात
गुरांच्या वाहनांना स्वतंत्र पार्किंग व्यवस्था तर बाजार समितीच्या उत्पन्नात होणार वाढ
दर्यापूर (तालुका प्रतिनिधी_)दर्यापूर शहरामध्ये गुरांचा आठवडी बाजार दर गुरुवारी भरत असतो दर्यापूर तालुक्यासह इतर ग्रामीण भागातून शेतकरी आठवडी बाजराच्या दिवशी नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होत असते तर अकोट रोड प्रसाद हॉटेल समोर व कृषी उत्पन्न बाजार समिती समोर गुरा ढोरांनी भरलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असतात त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे नवनियुक्त सभापती सुनील पाटील गावंडे यांच्या लक्षात येताच त्यांनी आज सकाळी पाच वाजता पहाटे पासूनच गुरांच्या बाजार समिती आवारात सभापती पोलीस प्रशासन व कर्मचारी समवेत खडा पहारा दिला व कायमस्वरूपी गुरांच्या वाहनांना पार्किंग व्यवस्था मार्केट यार्ड मध्ये उपलब्ध करून दिली गुरांना गुरांच्या बाजारामध्ये लिलावासाठी सुद्धा शिस्त लावली या शिस्तीमुळे आज बाजार समितीच्या आर्थिक मिळकतीत अधिक भर पडणार असल्याचे सभापती यांनी मत व्यक्त केले गुरांचा बाजार हा रस्त्यावरच भरत होता दलालांच्या माध्यमातून खरेदी-विक्रीचे परस्पर व्यवहार केले जात असल्याने बाजार समितीच्या उत्पन्नात कमालीची घट निर्माण झाली होती त्यावर प्रत्यक्ष लक्ष केंद्रित करत कायमस्वरूपी तोडगा आज सभापती सुनील पाटील गावंडे यांनी काढला आहे