Uncategorizedसामाजिक

सन उत्सवात नेर अग्रेसर, श्रीराम जन्मोत्सव निमित्त भव्य शोभायात्रा

Spread the love

सन उत्सवात नेर अग्रेसर, श्रीराम जन्मोत्सव निमित्त भव्य शोभायात्रा, रथावर राम लक्ष्मण सीता हनुमानाच्या वेशातील कलावंत, बंजारा समाजाचे नृत्य, लेझीममंधे महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग.
यवतमाळ जिल्ह्यात नेर शहर हे शोभायात्रेसाठी अग्रेसर आहे. श्रीराम ची शोभायात्रा नेर शहरातील यवतमाळ अमरावती राज्य महामार्गावरून ते पोलीस स्टेशन, जूणे बस स्टँड,नेर नगरपरिषद,नेताजी सुभाष चंद्र बोस, माळीपुरा,बारीपुरा,वाणीपुरा, मजीत, चांदनी चौक, गणपती मठ, तेलीपुरा, मारवाडी चौक, शिवाजी शाळा या मार्गाने ढोल ताशाच्या गजरात डीजे च्या आवाजात या मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. शोभायात्रेच्या रथासमोर राम भक्तांचे जेथ्थे च्या जेथ्थे दिसून येत होते. डीजे च्या गाण्यावर अनेक राम भक्त तल्लीन होउन नाचत होती. भगवे झेंडे घेऊन अनेक युवक भगवा झेंडा फिरवून श्री रामाचा जयघोष करीत होते. मिरवणुकीत महिलांच्या लेझीम सह बंजारा समाजाचा नृत्याचाही आनंद अनेकांनी घेतला. श्रीरामाच्या पूर्णाकृती फोटोसमोर राम, लक्ष्मण, सीता व हनुमानाच्या वेशभूषेतील लहान कलावंत एेटीत बसलेले दिसून येते होती. रामभक्त साठी मारवाडी चौकात शितपेय्याची व्यवस्था करण्यात आली होती. नाचल्यामुळे थकलेल्या रामभक्तना हनुमान नगरात मिरवणूक संपल्या नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकीत भाईचारा दिसून आला.रामभक्त ईतरही समाज बांधवासोबत नाचतांनी दिसुन येत होती. मिरवणुकीच्या दरम्यान विद्युत पुरवठा खंडित होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे कर्मचारी डोळ्यात अंजन घालून गस्त
घालत होती. मिरवणूकीत कुठलाही अणूचीत प्रकार घडून गालबोट लागू नये यासाठी नेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव, नेर तहसीलचे नायब तहसीलदार नरेंद्र थोटे, पोलीस कर्मचारी, शांतता समितीचे सदस्य मिरवणूकीवर कटाक्ष ठेवून होते. या सगळ्यावर पत्रकारांची बारीक नजर होती. सर्वांच्या सहकार्याने मिरवणूक पार पडली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Close
Close