ब्रेकिंग न्यूज

गोकुलसरा घाटात नियमबाह्य उपसा ? 

Spread the love
 ‘ शहर बसा नही की लुटेरे तैयार ‘ चा येतोय प्रत्यय 
अधिकारी संपावर असल्याने घेतला जात आहे गैरफायदा की मिलीभगत ? 
धामणगाव रेल्वे / विशेष प्रतिनिधी 
              गोकुलसरा घाटातून नियमबाह्य वाळू उपसा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे,. नुकताच घाटाचा लिलाव झाला आहे.असे असतांना सुद्धा नियमबाह्य उपसा सुरू असल्याने   ‘ शहर बसा नही की लुटेरे तैयार चा प्रत्यय येत आहे.  घाट मालक आणि अधिकारी यांच्यात मिलीभगत आहे की घाट चालक कर्मचारी संपावर असल्याचा गैरफायदा उव्हाळात आहे हे अधिकारी वर्ग आल्यावर कळणार आहे.
                    काही दिवसांपूर्वी तालुक्यातील काही घाटांचा लिलाव झाला आहे. त्यामुळे आता घरकुल लाभार्थ्यांना आणि सामान्य नागरिकांना 600 /- येऊ प्रति बरोस प्रमाणे वाळू मिळेल अश्या अपेक्षा असतांना तालुक्यात मात्र वेगळे चित्र पाहायला मिळत आहे.
घाटावर सुरू आहे नियमबाह्य उपसा – शासकीय नियमानुसार घाट चालकाला नदी पात्रातून वाळू काढण्यासाठी मशनरिज (यंत्राचा) वापर करता गेट नाही .असे असतांना सुद्धा गोकुलसरा घाटावर पोकलॅन्ड द्वारे वाळू उपसा होत आहे.  ( सा. नवप्रहार कडे याचे पुरावे आणि व्हिडीओ उपलब्ध आहेत. )
 ‘ शहर बसा नही की लुटेरे तैयार ‘ चा येतोय प्रत्यय –   एक म्हण आहे की  ‘ शहर बसा नही की लुटेरे तैयार ‘ असाच प्रत्यय गोकुलसरा घाटात येतोय.एक दोन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या घाटात आता पासून यंत्राने वाळू उपसा सुरू झाल्याने तालुक्यात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांशी मिलीभगत की संपाचा गैरफायदा ,- हा सगळा नियमबाह्य प्रकार अधिकाऱ्यांची कथित हातमिळवणी करून केल्या जात आहे. किंवा आज कर्मचाऱ्यांचा राज्यवापी संप असल्याचा घाट चालक फायदा उचलत आहेत. हे उद्या माहीतच पडणार आहे.
या अवैध प्रकारचे व्हिडीओ शासन आणि प्रशासन दरबारी –  सा.नवप्रहार कडे या अवैध उपस्याची चित्रफीत ( व्हिडीओ ) आले असून महसूल विभागाकडून कारवाई न झाल्यास सदर व्हिडीओ नागपूर हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात येणार आहेत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close