खिरगव्हाण ग्रामपंचायत कार्यालय तर्फे कचरा व प्लाँस्टिक निर्मुलन अभियान
दर्यापूर— कैलास कुलट
तालुका प्रतिनिधी
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय तर्फे विविध अभियान राबविल्या जात आहे. त्याच अनुषंगाने प्लाँस्टीक, कुळा कचरा, केर कचरा गोळा करुन निर्मुलन अभियान राबविण्यात आले.त्यामध्ये दिनांक 18 जून 2023 ला सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत अभियान राबविण्यात आले.यामध्ये समस्त गावकऱ्यांच्या लोकसहभागातून संत गाडगेबाबा चौक, ग्रामपंचायत कार्यालय परिसर, महादेव मंदिर रस्ता, विठ्ठल नगर परिसर ,आनंद नगर परिसर, मौलाना अबुल कलाम आझाद चौक, शिवाजीनगर चौक, संपूर्ण गावाची प्लास्टिक,कुळाकचरा,केर कचरा वेचून साफसफाई करण्यात आली याकरिता गावातील शिव— भिम ग्रुपचे तरुण मंडळी तसेच ग्रामपंचायत खीरगव्हांचे सरपंच सौ सुजाता दीपक सरदार,उपसरपंच श्री नरहरी रायपुरे, ग्रामपंचायतचे सदस्य श्री गजानन रं.घोगरे, श्री हर्षल म. काकड, सौ नंदाताई ग. घोगरे, सौ ज्योत्स्ना ताई नि.घोगरे ,सौ प्रांजली कै. कुलट , सौ सुनंदा अ. भटकर, श्री अजय वि बाविस्कर, ग्रामपंचायत कर्मचारी, श्री योगेश ज्ञा. घोगरे जलसुरक्षा रक्षक ,श्री रत्नदीप वं.घोगरे रोजगार सेवक, श्री दीपक राव सरदार, श्री सचिन प्र गावंडे. श्री तेजस घोगरे ,शेख राजिक शेख रफिक, सय्यद शाहरुख सय्यद जमशीद भाई, आकाश संजय सरदार , अभिषेक घोगरे,अथर्व बाविस्कर, श्री ऋत्विक वाकपांजर श्री विकी सरदार ,श्री रवी सरदार, श्री सुरेश भाऊ घोगरे आदी सर्वांनी संपूर्ण गाव प्लास्टिक मुक्त करण्याची शपथ घेतली. समस्त गावकऱ्यांनी सहकार्य केले.