नागोराव दादा सदाफळे नवोदय विद्यालयातून चि . वेदान्त अमोल गावंडे इयत्ता दहावीमध्ये प्रथम
हिवरखेड :-नवोदय ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ हिवरखेड द्वारा संचालित नागोराव दादा सदाफळे नवोदय विद्यालयाची इयत्ता दहावी निकालाची परंपरा यावर्षीही कायम राहिली. चि. वेदान्त अमोल गावंडे याने ८३% गुण मिळवून विद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकाविला. तर कु.ईश्वरी सुनील श्रीराव ८२.४०% व्दितीय, चि. नैतिक सुधीर ढोमने ८०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल लागला आहे. विद्यालयातील ५२विद्यार्थ्यांपैकी ४०विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी प्राविण्य श्रेणीत ६ , प्रथम श्रेणीत१२ ,व्दितीय श्रेणीत१४विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावेळी संस्थेचे संचालक मंडळ. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सविता ठाकरे, कु. सुनीता श्रीवास ,संजय बोण्डे,श्रीकांत विघे, सौ. प्रगती फुले, कु. स्वाती पारिसे ,निलेश रायचुरा,प्रल्हाद बुले ,महादेव नागदेवे ,उमेश चव्हाण., प्रा. विजय चिंचमलातपुरे ,प्रा. अमोल देशमुख, प्रा. हेमंत देशमुख ,अशोक डवरे,दिलीप अजमिरे ,महादेव कदम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.