हटके

रोज संध्याकाळी निघायची प्रेतयात्रा ; सत्य मात्र वेगळेच ,पोलिसही चक्रावले

Spread the love
मुज्जफर नगर / विशेष प्रतिनिधी

                    प्रेतयात्रा म्हटल्यावर जनतेच्या मनात एक वेगळी सहानुभूती असते. प्रेतयात्रा जात असल्यास लोक त्यांना मार्ग मोकळा करून देतात. पण बिहार च्या मुज्जफर नगर  पोलीस स्टेशन हद्दीतील गावातून राज संध्याकाळी प्रेतयात्रा जात असल्याने जनतेला संशय आला. त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. पोलिसांना सत्य समजताच पोलिसही चक्रावले. 

         ईतर गावांप्रमाणे मुज्जफर नगर च्या माधोपुर येथील स्मशानभूमी ही गावाबाहेर होती. पण येथे रोज संध्याकाळच्या वेळेस ‘ राम नाम सत्य है ‘ असे म्हणत प्रेतयात्रा निघत होती. जवळपास एक महिन्यापासून हा क्रम सुरू होता. जवळपासच्या गावात रोज कोण मरतंय या बद्दल लोजांनी माहिती गोळा करणे सुरू केले होते. कारण रोज निघणाऱ्या प्रेतयात्रे मुळे त्यांना संशय येऊ लागला होता. त्यांनी या बद्दल ची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना जी माहिती मिळाली ती ऐकून पोलिसही चक्रावले.

प्रेतयात्रेच्या नावाखाली चालू होता गोरखधंदा – पोलिसांनी जेव्हा गावकऱ्यांच्या तक्रारीवरून स्मशानात जाऊन पाहिले तेव्हा त्यांना  गावठी दारूच्या भट्ट्या काढक्याचे दिसले. त्यांनी याठिकाणी पाळत ठेवली असता त्यांना समजले की काही लोक प्रतिकात्मक प्रेत यात्रेच्या नावावर दारू काढण्याचे साहित्य आणतात आणि स्मशानात दारू काढतात.

– पोलिसांना पाहताच त्यांनी काढला पळ – पोलिसांना या कारनाम्याबद्दल माहिती मिळाल्यावर त्यांनी धाड टाकण्याचे ठरवले. पोलीस स्मशानात पोहचताच दारू काढणाऱ्यांनी तेथून पळ काढला . त्यांना दारू काढणारे गवसले नाही पण पोलिसांनी दारू काढण्याचे साहित्य नष्ट केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close