हटके

अचानक लोक रस्त्यावर सैरावैरा पळू लागले ; सोशल मीडियावर ही घटना होतेय व्हायरल 

Spread the love

             सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत असे काही व्हिडीओ असतात जे लोकांच्या मनात धडकी भरवतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तुम्ही पाहू शकता की एक गेंडा रस्त्यावर धावताना दिलात आहे. गेंड्याला आपल्या कडे  येतांना पाहून लोक सैरावैरा पळताना दिसत आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे सांगता येत नाही. पण तो नेपाळचा असावा असा अंदाज आहे.

गेंडा किती धोकादायक आहे हे सांगण्याची गरज नाही. जंगलात गेंड्याला पाहण्यासाठी लोक सफारीला जातात. पण त्यावेळीही सफारी ऑपरेटर आपलं वाहन गेंड्यापासून दूर ठेवतो. पण कल्पना करा की जर हाच गेंडा शहरात शिरला तर काय गोंधळ होईल, जिथे ना सफारी ऑपरेटर आहे, ना कोणतीही सुरक्षा व्यवस्था!

असच एक दृश्य एका व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे, ज्यामध्ये एक गेंडा शहरात शिरतो आणि नंतर भीतीचं वातावरण निर्माण होतं.

नुकताच एक व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंट @janakbasnet65 वर पोस्ट करण्यात आला आहे, जो नेपाळचा असल्याचा अंदाज आहे. कारण जो व्यक्ती तो पोस्ट करतो तोही नेपाळचा आहे. तरीही या ठिकाणाबद्दल अचूक माहिती नाही. व्हिडिओमध्ये, गेंडा शेत-मळ्यातून शहरी भागात प्रवेश करतो आणि नंतर दहशत माजवायला सुरुवात करतो. गेंड्याचं आकार महाकाय आहे, त्याच्यासमोर बाइक आणि त्यावरचा माणूस खूपच छोटे दिसतात.
 

 

 

 

शहरात शिरलेला हा गेंडा या व्हिडिओमध्येही दिसतोय. गेंडा धावत रस्त्यावर पोहोचला अन् त्याच्यासमोर एक बाइकस्वार आला आणि त्याने त्याच्यावर शिंगाने त्यावर हल्ला केला. माणसाने आपली बाइक तिथेच सोडली आणि सैरावैरा पळू लागला. संपूर्ण परिसरात गेंड्याने खळबळ उडवून दिली. सर्वजण आपापल्या घरात जाऊ लागले. गेंडाही इकडे तिकडे धावत होता, हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. हा होत आहे.

या व्हिडिओला 1 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेक लोकांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकाने म्हटलं की, अशा परिस्थितीत कॅमेरामन कधीच मरत नाही! एकाने म्हटलं की, लोक त्याच्या मागे का धावत आहेत? आणखी एकाने म्हटलं की, कॅमेरामन घाबरला होता, पण तरीही तो गेंड्याचा पाठलाग करत राहिला आणि व्हिडिओ रेकॉर्ड करत राहिला, म्हणूनच तो कमाल आहे!

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close