सामाजिक

एक कॉल आणि नवरा बायकोने क्षणात संपवले जीवन

Spread the love

सावकाराच्या जाचाला कंटाळून मृत्यूला कवटाळल्याची चर्चा 

विशेष प्रतिनिधी अहिल्यानगर

               या जीवनाचे कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे तुम्हाला परमेश्वराने दिलेले जीवन आनंदात आणि हसतखेळत जगा असे कुटुंबातील मोठे व्यक्ती सांगत असतात. सावकाराच्या जाचाला कंटाळून त्यांनी जीवन संपवल्याची चर्चा आहे.

नवरा बायकोने राहत्या घरात  साडीने गळफास लावून जीवन संपवलं आहे. एकाच वेळी दाम्पत्याने अशप्रकारे आयुष्य संपवल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दाम्पत्याच्या या निर्णयामुळे त्यांची दोन्ही मुलं पोरकी झाली आहेत. त्यांच्या डोक्यावरील आई वडिलांचं क्षत्र हरपलं आहे.

बाळासाहेब पांडुरंग पिसाळ आणि कीर्ती बाळासाहेब पिसाळ असं आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचं नाव आहे. दोघांच्या मृत्यूनंतर बाळासाहेब पिसाळ यांच्या मेहुण्याने खळबळजनक दावा केला आहे. आत्महत्येपूर्वी पिसाळ यांना व्हॉट्सअॅपवर कॉल आला होता. यानंतर अवघ्या १५ मिनिटांतच त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यांना खासगी सावकारीचा त्रास होत होता. यातूनच त्यांनी जीवन संपवल्याचं बाळासाहेब पिसाळ यांचे मेहुणे गणेश वाडीतके यांनी सांगितलं. बुधवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण श्रीरामपूर तालुक्यात हळहळ व्यक्त केलं जात आहे.

सावकारांच्या धमक्यांमुळे दाम्पत्य होते अस्वस्थ


मिळालेल्या माहितीनुसार, बाळासाहेब पांडुरंग पिसाळ आणि कीर्ती बाळासाहेब पिसाळ हे भेर्डापूर येथे वास्तव्याला होते. त्यांनी राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास लावून आपलं जीवन संपवलं. गेल्या काही महिन्यांपासून खासगी सावकारांकडून पैशांच्या वसुलीसाठी त्यांच्याकडे सतत तगादा लावला जात होता. तसेच सावकार त्यांना धमक्या देत असल्याने बाळासाहेब पिसाळ हे प्रचंड मानसिक दबावात होते. अखेर या सततच्या जाचाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचललं.

१० वर्षांचा मुलगा अन् ९ वर्षांची मुलगी झाली अनाथ


या घटनेतील सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे पिसाळ दाम्पत्याच्या पाठीमागे त्यांचा १० वर्षांचा मुलगा आणि ९ वर्षांची मुलगी असा परिवार आहे. आई-वडिलांनी अचानक जीवन संपवल्याने ही दोन्ही लहान मुले अनाथ झाली आहेत. चिमुकल्यांच्या डोक्यावरील छत्र हरवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दोषी सावकारांवर कडक कारवाईची मागणी

या दुर्दैवी घटनेनंतर मृत पिसाळ दाम्पत्याच्या नातेवाईकांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. खाजगी सावकारांच्या बेकायदेशीर जाचामुळे आणि त्रासामुळेच या दोघांनी आत्महत्या केली असल्याचा थेट आरोप नातेवाईकांनी केला आहे. संबंधित खाजगी सावकारांचा शोध घेऊन त्यांच्यावर तत्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि या पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील कसून तपास करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close