मानोरा येथील खून प्रकरणात दोघांना अटक.
मारेकऱ्यांमधील दोन कारंजा येथील रहिवासी.
बहिणीला छेड काढल्याने घडला प्रकार.
कारंजा / प्रतिनिधी
दिनांक 26 मे रोजी वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथील छत्रपती शिवाजी चौकात सात ते आठ हल्लेखोरांनी दोन युवकांवर चाकूने हल्ला केला होता.
या हल्ल्यामधे शिवदास उघडे या युवकाचा मृत्यू झाला होता व प्रवीण चव्हाण हा युवक गंभीर जखमी झाला असून त्यास अकोला येथे उपचारासाठी पाठवण्यात आले होते.
या खुनाच्या प्रकरणात मानोरा पोलिसांनी अत्यंत जलद गतीने तपास कार्यास सुरुवात केली.
फिर्यादीच्या बयानानुसार हल्ला करणाऱ्यांपैकी सात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या खून प्रकरणातील दोन आरोपी कारंजा लाड येथील रहिवासी असल्याची माहिती पोलीस तपासा दरम्यान निदर्शनास आली आहे.
या खून प्रकरणाविषयी सविस्तर माहिती अशी की खून प्रकरणातील एक आरोपी हा फिर्यादीच्या बहिणीची नेहमीच छेड काढत होता अशी तक्रार फिर्यादीच्या बहिणीने फिर्यादीकडे केली होती, त्यामुळे फिर्यादीने आरोपीस फोन करून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आरोपीने फिर्यादीलाच दम देऊन मानोरा येथील छत्रपती शिवाजी चौकात ये तुला दाखवतो असे म्हंटले फिर्यादीचे दोन-तीन मित्र व फिर्यादीचा भाऊ तसेच आरोपी सोबतचे सात आठ मित्र यांची दिनांक 26 मे रोजी छत्रपती शिवाजी चौकात शाब्दिक चकमक होऊन चकमकीचे रूपांतर वादात होऊन आरोपींनी दोन युवकांवर चाकूने हल्ला केला
व या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला असून या प्रकरणाचा तपास अतिशय जलद गतीने करण्याचे आदेश वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिल्यामुळे.
उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कुचेकर, उपनिरीक्षक रामेश्र्वर नागरे, व मानोरा डि. बी. चे गणेश जाधव, मयुरेश तिवारी, बालाजी महल्ले, बन्सी चव्हाण, यांनी दोन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुद्धा लवकरच करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.