बद्रीनाथ / नवप्रहार डेस्क
चालकाचे भाविकांनी भरलेल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन अलकनंदा नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 भाविकांचा मृत्यू झाला आहे तर 7 भाविक जखमी आहेत.
अपघातावेळी बसमध्ये 23 जण होते. ही बस भाविकांना घेऊन श्रीनगरहून बद्रीनाथ महामार्गावरून जात असताना हा अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाचे बचाव पथक आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले. भाविकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा अपघात इतका भीषण आहे की बस चक्काचूर झाली असून अनेकजण बसमध्ये अडकल्याची शक्यता आहे. दरम्यान अपघातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मदतकार्य सुरू आहे.