शेतकऱ्यांना संत्रा फळगळ,किड-रोग व अन्नद्रव्य व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन!
चांदूर बाजार / प्रतिनिधि
दिनांक 07 ऑगस्ट 2024 रोजी सिट्रस इस्टेट चांदूरबाजार व तालुका कृषी अधिकारी चांदूरबाजार यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील संत्रा फळबागांचे कृषी विद्यापीठ अकोला येथील शास्त्रज्ञ मार्फत सर्वेक्षण करून तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संत्रा फळगळ कारणे व त्यावरील उपाय योजना, विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव त्यावरील उपाय योजना आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सद्यपरिस्थितीत सतत चालू असलेला पाऊस,ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाशाचा अभाव व त्यामुळे भौतिक व वनस्पती शास्त्रीय कारणामुळे झाडांच्या आंतरिक क्रिया मंदावल्यामुळे फळगळ व कीड – रोगास पोषक वातावरण निर्माण झाल्याने त्याचे व्यवस्थापन व उपाय योजना वेळीच करणे आवश्यक असल्याने “सिट्रस इस्टेट चांदूरबाजार” मार्फत सदर परिस्थितीची दखल घेत दिनांक 02/08/2024 रोजी पहिल्या टप्यात ब्राम्हणवाडा पाठक,वणी बेलखेडा,कुरणखेड, घाटलाडकी, ब्राम्हणवाडा थडी, जसापुर, काजली, मांधान परिसरातल्या संत्रा बागेची पाहणी करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संत्रा फळगळ व त्याची कारणे व उपाय योजना, विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव त्यावरील उपाय योजना आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
*दुसऱ्या टप्यात आज दिनांक 07/08/2024 रोजी* मौजा हैदतपुर वडाळा, फुबगाव, कुरळपूर्णा, थुगाव, पिपंरीपूर्णा, शिरजगाव कसबा, करजगाव आणि खरपी गावातील संत्रा बागाना भेटी देवून शेतकऱ्यांना संत्रा फळगळ, किडरोग आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन करण्यात आले.शेतकऱ्यांच्या अडचणी व प्रश्नांना शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन करून उतर दिली व समस्यांचे निराकरण केले.दरम्यान मां.ओमप्रकाश उर्फ बच्छुभाऊ कडू आमदार (अचलपूर विधानसभा मतदार संघ)यांनी कुरलपूर्णा येथे सदर क्षेत्रीय भेटीतील शास्त्रज्ञ व अधिकारी यांचा तालुक्यात करण्यात आलेल्या व करण्यात येत असलेल्या सर्व्हेक्षनाचा व परिस्थितीचा आढावा घेत तालुक्यातील संत्रफळपिका वरील किड रोग,फळगळ व अन्नद्रव्य व्यवस्थापन बाबत चर्चा केली व शेतकऱ्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन करून अडचणीचे निराकरण करण्याबाबत सूचना दिल्या.
यावेळी डॉ.राजेंद्र वानखेडे सहाय्यक प्राध्यापक,फलोत्पादन कृषी संशोधन केंद्र अचलपूर,
डॉ.प्रशांत मगरे वरिष्ठ संशोधन सहाय्यक मृदाशास्त्र,कृषी संशोधन केंद्र अचलपूर, श्री.अजय गाठे वरिष्ठ संशोधन सहाय्यक,वनस्पती रोगशस्त्र पानवेली संशोधन केंद्र दिवठाणा ,कु एस.एम.नागे सहाय्यक प्राध्यापक, वनस्पती कीटकशास्त्रज्ञ,कृषी संशोधन केंद्र अचलपूर,
श्री.एस.पी. दांडेगावकर मुख्य कार्यकारी अधिकारी सिट्रस इस्टेट चांदूरबाजार,श्री.मनोज वानखेडे श्री.किशोर वनवे मंडळ कृषी अधिकारी ब्राम्हणवाडा थडी,सिट्रस इस्टेट कार्यकारणी सदस्यश्री.संतोष किटुकले,श्री पुष्पक खापरे,श्री संदीप मोहोड,कुं.दिपाली डमके तांत्रिक सहाय्यक सिट्रस इस्टेट,निलेश काजळकर कृषी सहाय्यक मासोद,निलेश ढोबळे कृषी सहाय्यक करंजगाव,ललित कोठाले कृषी सहाय्यक शिरजगावकसबा,वैभव इंगोले कृषी सहाय्यक खरपी कुषी सहाय्यक दिनेश वराडे व मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.