बाजारसमीतीची निवडणूक जमीन खरेदिसह,विकास व शेतकरी हिताच्या मुद्यावर लढु – अनंत साबळे
शेतकरी व बाजार समीतीचे हीताआड येणाऱ्यांना जागा दाखवणार, —– अनंत साबळे –
(मनोहर मुरकुटे) अंजनगांवसुर्जी
आगामी अठ्ठावीस तारखेला होणाऱ्या बाजारसमीतीच्या निवडणुकीत सहकार पॕनलने नवतरुणांसह,अनुभवी बेदाग चेहऱ्यांना समीतिवर पाठवन्याचा निर्णय घेतला आहे, विरोधी उमेदवारांकडून होत असलेल्या आरोप प्रत्यारोपाचे खंडन करण्यासाठी काल दि.२३ ला सहकार पॅनल तर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ह्यामध्ये मागील बाजारसमीतीचे संचालकांनी बाजारसमीतीने अधीग्रहीत केलेल्या जमीनीच्या अधीग्रहणात केलेला संधीसाधुपना व जमीनीच्या अवतीभोवती फीरणाऱ्या राजकारणात बाजारसमीतीची खुंटलेली प्रगती दृस्टीक्षेपात ठेऊन समीतीच्या सर्वांगीन विकासाचे उद्दिष्ट व शेतकऱ्यांचा फायदा व बाजारसमीतीचा विकास थांबवणाऱ्या दोषींवर कारवाई, व गतपंचवार्षिक मध्ये तूर खरेदीत झालेला भ्रष्टाचार,सचिवा वर लागलेले आरोप, बाजार समितीच्या उत्पन्नात संचालक व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने होत असलेली घट तथा गेल्या पंचवार्षिक मधील संपूर्ण भ्रष्टाचार हा बाजार समितीला लागलेला काळा डाग पुसण्यासाठी सहकार पॅनल सर्वतोपरी प्रयत्न करून या मुद्द्यावरच निवडणुक लढली जाईल असे सहकार पॕनल चे वतीने काल घेतलेल्या पत्रकार परीदेत सहकार गटाचे नेतृत्व करणारे नेते अनंत साबळे व शशिकांत मंगळे यांनी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पस्ट केले. बाजारसमीतीचे सोळा पैकी पंधरा संचालक बाजारसमीतीची निवडणुक सहा वर्षाकरीता लढण्यास अपात्र झाले हा तालुक्याचे सहकाराला लागलेला बट्टा आहे, मागील संचालक मंडळाकडुन बाजारसमीतीची झालेली बदनामी न भरणारी असुन बाजार समीतीला अधीग्रहीत झालेल्या सोन्याच्या कीमतीची जमीन खरेदीच्या मुद्याला प्राथमिकता व प्राधान्य असेल. करोडो रुपयाचे जमीनीवर शेतकरी प्रशीक्षन केंद्र ,टी.एम.सी,नाशवंत मालाकरीता कोल्डस्टोरेज,निवास व भोजन व्यवस्था,शेतकऱ्यांचे मुलामुलींचे लग्न व ईतर कार्याकरीता मंगलकार्यालय,झुनकाभाकर केंद्र, बाजारसमीतीचे ऊत्पन्न जे कापुस सेस ,धान्य,भाजीपाला,गुरांची विक्री या माध्यमातून ज्या प्रमानात मिळाला पाहीजे ते मिळवण्याचे साडेतीन ते चारकोटीचे उद्दिष्ट ठेउन विकास करण्याचा संकल्प करुण आम्ही नव्यादमाच्या नवतरुणांच्या साथीला अनुभवी बेदाग व शेतीहाच ज्यांचे उपजीवेकेचे प्रमुख साधन म्हणुन,ज्यांना शेतकऱ्यांचे समोरील आव्हानांची जान आहे अश्या उमेदवारांनाच बाजारसमीतीवर संधी दीली असुन,विरोधकांन जवळ कोनताही मुद्दा नसुन ते फक्त संचालक पदावर डोळा ठेऊन निवडणूक लढत आहेत,त्यांना पराभवाची भीती वाटत असल्याने ते आमच्या उदवाराचे विरोधात उच्च न्यायालय नागपुर पर्यत जाऊन उमेदवारी रद्द करण्याचा त्यांचा प्रयत्न असफल झाला असुन निवडणुकीचे पुर्वीच कोर्ट कचेऱ्या करणारे विरोधक कोर्ट कचेऱ्या करण्यासाठी निवडणुकीत उभे आहेत काय असा प्रती सवाल करीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत साबळे हे सभापती पदाचे उमेदवार नसून ते सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य असल्याने,तसेच त्यांना कायद्याचे ज्ञान असल्याने त्यांना बाजार समितीमध्ये सर्वांच्या सहमतीने उमेदवारी दिल्याचे सांगितले शेतकऱ्यांनी व मतदारांनी बाजारसमीतीच्या सर्वांगीन विकासाकरीता सहकार पॕनलला बहुमताने निवडुन देण्याचे आव्हान यावेळी केले.यावेळी सहकाराचे नेते अनंत साबळे ,शषीकांत मंगळे,अशोक चरपे,
होते.