गोविंदपुर ते सायफळ रस्त्याच्या कामाकडे बांधकाम विभागाचे अधिकारी फिरकतील का ?
एकाच पावसाने रस्त्याच्या बाजूचे हालत खराब.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
घाटंजी बांधकाम उपविभाग अंतर्गत येणाऱ्या सायफळ ते गोविंदपुर हा रस्ता राज्यमार्ग असून हा रस्ता मराठवाडा तेलंगाना राज्यात जाण्यासाठी कमी अंतराचा मार्ग असल्याने याच रस्त्याने वाहधाकरक मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात. गेल्या काही दिवसापासुन सायफळ ते गोविंदपुर रस्त्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली पण, सदर रस्ता एकेरी असल्याने रस्त्याची बाजू मजबूत असणे गरजेचे होते तरी मात्र रस्त्याची बाजू भरण्यासाठी मुरूमाचे वापर करण्या एवजी चक्क काळी माती टाकल्याने काल,परवा रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक वाहने रस्त्याच्या कडेला फसल्याने ईतर वाहनासह एस टी बस धारकांना तासनतास ताटकळत राहावे लागले. यामुळे नागरीकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे .या रस्त्याच्या कामाकडे बांधकाम विभागाचे एकही अधिकारी फिरकत नसल्याने कंत्राटदाराच्या मनमानीनेच काम सुरू असल्याचे दिसून येत असल्याचे बोलल्या जात आहे. कंत्राटदार रस्त्याच्या बाजुलाच खोदून मातीने बाजू भरत असल्याने पहील्याच अवकाळी पावसामुळे रस्त्याच्या बाजूचे पितळ उघडे पडले आहे रस्त्याच्या बाजुला टाकलेल्या काळी माती व दगडामुळे आज अनेक दुचाकी स्लिप होऊन अपघात घटना घडल्याचे समोर आले आहे याकडे बांधकाम विभागाचे अभियंता लक्ष देऊन रस्त्याची बाजू मजबूत करतील का? हे पाहणे अपेक्षित आहे.